Shardiya Navratri 2022
Shardiya Navratri 2022 esakal
जळगाव

Shardiya Navratri 2022 : जल्लोष गरबा; दांडियाला महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी आयोजित केलेल्या व आशीर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर तसेच एमएसपी बिल्डकॉनचे मनोज पाटील यांनी प्रायोजित केलेल्या ग्रीन ॲपल इव्हेंट प्रस्तुत गरबा -दांडिया जल्लोष २०२२ मधून दररोज बक्षीस म्हणून पैठण्यांची होत असलेली उधळण महिलांचे आकर्षण ठरत आहे. त्यामुळे महिलांची अलोट गर्दी उसळत आहे.

बुधवारी आदिशक्ती देवीचा जागर व आरतीने प्रारंभ झाला. याप्रसंगी आमदार किशोर पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई पाटील, माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील, पीपल्स बँक संचालिका मयुरी बिल्दीकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, स्पर्धेचे आयोजक सुमित पाटील, मुकुंद बिल्दीकर, शरद पाटे, आदित्य बिल्दीकर, अरुण ओझा, वैभव राजपूत, विजय भोई, सुमित सावंत, मुन्ना गौड, प्रवीण पाटील, ग्रीन ॲपल इव्हेंटचे संदीप महाजन, जितेंद्र काळे, राहुल पाटील, सागर शेख, धनराज पाटील उपस्थित होते. (Record breaking women rush to garba in pachora jalgaon marathi news)

स्वरा दराडे या बालिकेस बाल स्पर्धक म्हणून दोन हजार रुपयांचे रोख पारितोषिक सुमित पाटील व आदित्य बिल्दीकर यांच्या वतीने देण्यात आले. बुधवारी उज्ज्वला राजपूत, गौरी जोशी, निकिता दराडे, शोभा देवरे, सुनिता येवले या महिला पैठणीच्या मानकरी ठरल्या तर प्रश्न उत्तर स्पर्धेत तन्मय शिंदे, ज्ञानेश्वर महाजन, श्‍याम पाटील ,दीपक पाटील यांनी बक्षीस मिळवले. प्रा. सी. एन. चौधरी यांनी प्रश्नमंजूषा स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.

नर्मदा पाटील, सुनीता पाटील, मयुरी बिल्दीकर, सुमित पाटील, मुकुंदा बिल्दीकर, आदित्य बिल्दीकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. ग्रीन ॲपल इव्हेंटचे संदीप महाजन यांनी प्रेक्षकांच्या सहभाग, सहकार्य व प्रतिसादा बद्दल आभार व्यक्त केले तसेच १ आणि २ ऑक्टोबरला दांडिया- गरबा ग्रुपचे आयोजन करण्यात आले असून, फक्त त्याची नावनोंदणी सुरू आहे. इतर प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आली आहे, असे ग्रीन ऍपल इव्हेन्टने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT