Pachora: Ganesh Patil, P A. Patil, Prakash Tambe, Sunil Patil, Rahul Patil, B. B. Borude etc. esakal
जळगाव

Jalgaon News : वरखेडी गुरांच्या बाजारात विक्रमी उत्पन्न; योजनांची यशस्वी अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरखेडी उपबाजार समितीत दर गुरुवारी भरणाऱ्या गुरांच्या बाजाराचे प्रथमच सुमारे सव्वा लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाल्याने नवनिर्वाचित सभापती व संचालक मंडळाचे कौतुक होत आहे.

बाजार समितीचा कारभार शिवसेनेचे गणेश पाटील यांनी हाती घेतल्यानंतर बाजार समितीवरील कर्ज पाहता बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी काटकसरीच्या धोरणासह विविध योजना राबवल्या जात आहेत.(Record income in Varkhedi cattle market Successful Implementation of Schemes Purchase and sale from state as well as foreign traders Jalgaon News)

वरखेडी येथे दर गुरुवारी भरणाऱ्या गुरांच्या बाजारात राज्यासह परराज्यातील व्यापारी गुरांच्या खरेदी विक्रीसाठी येतात. या बाजारातील उत्पन्न वाढ व्हावी म्हणून सभापती गणेश पाटील व संचालकांनी वैयक्तिक लक्ष केंद्रित करून तसेच कर्मचाऱ्यांना सजग करून कुणालाही कोणत्याही प्रकारची सवलत न देता कर वसुली केल्याने बाजार समितीचे उत्पन्न प्रथमच १ लाख १९ हजार पर्यंत गेले आहे.

बाजार समितीच्या वाढत्या उत्पन्नातून समिती आवारात गुरांसाठी शेड, ग्राहक व व्यापाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, पार्किंगसह इतर सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे गणेश पाटील यांनी स्पष्ट केले.

उपसभापती पी. ए. पाटील, संचालक राहुल पाटील, प्रकाश तांबे, विजय पाटील हे संचालक वरखेडी परिसरातीलच रहिवासी असल्याने त्यांनी योग्य ते नियोजन केल्याने विक्रमी उत्पन्न वाढ शक्य झाली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकारी, संचालक, सचिव बी. बी. बोरूडे व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाचोरा बाजार समितीत ‘बायोमेट्रिक’

पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचा शुभारंभ नुकताच सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना वेळेचे महत्त्व कळावे, त्यांनी वेळेचे बंधन पाळावे, बाजार समितीचे कामकाज पारदर्शक व वेळेत व्हावे, या उद्देशाने गणेश पाटील यांनी बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय घेऊन ही यंत्रणा कार्यान्वित केली.

याप्रसंगी उपसभापती पी. ए. पाटील, प्रकाश तांबे, सुनील पाटील, राहुल पाटील, सचिव बी. बी. बोरुडे यांच्यासह कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. या यंत्रणेसाठी समुपदेशक अमोल सूर्यवंशी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. हमाल, मापाडी, कर्मचारी यांच्यासाठी ही यंत्रणा असल्याने या यंत्रणेचा वापर करण्याचे आवाहन गणेश पाटील व सचिव बी. बी. बोरुडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT