Ready road from Kavyaratnavali Chowk to D Mart dug on Saturday to provide connection from Amrit Canal.  esakal
जळगाव

Jalgaon Amrut Yojana : ‘अमृत’साठी येरे माझ्या मागल्या सुरुच! तयार रस्ता पुन्हा खोदला...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Amrut Yojana : अमृत योजनेंतर्गत मनपाचे खोदकाम थांबायचे नाव घेत नाही. तयार रस्ते खोदण्याचे ‘येरे माझ्या मागल्या’ सुरुच असून, महिनाभरापूर्वी तयार झालेल्या काव्यरत्नावली चौक ते डी मार्ट रस्त्यावर शनिवारी (ता. १५) ‘अमृत’चे कनेक्शन जोडण्यासाठी पुन्हा खोदकाम करण्यात आले. (Redigging was done on completed road to connect Amrit connection jalgaon News)

हा तयार रस्ता खोदल्याने नागरिकांच्या संतप्त भावना व्यक्त होत असून, हा प्रकार कधी थांबणार असा प्रश्‍न उपस्थित होतोय. शहरात अनेक वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. मात्र ती पूर्ण होऊच नये म्हणून काही घटक सक्रिय असल्याचे दिसून येते. एकीकडे रस्त्यांची कामे सुरु झाल्यानंतर त्यावर खोदकाम नको, असे आदेश असताना मनपाकडून नियोजनशून्य कारभाराचा प्रत्यय रोज येत आहे.

पुन्हा खोदला तयार रस्ता

शनिवारी अमृतच्या जलवाहिनीतून चार इंची कनेक्शन देण्यासाठी काव्यरत्नावली चौक ते डी मार्टच्या रस्त्यावर माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्या निवासाकडील वळणावर खोदकाम करण्यात आले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

आता नुकताच तयार झालेला हा रस्ता खोदल्याने नागरिकांचा संताप होणे स्वाभाविक होते. ज्यांनी रस्ता खोदला, ती एजन्सी तो दुरस्त करेलही. पण त्याची मजबुती आता राहणार नाही.

‘अब तक छप्पन...’

इच्छादेवी ते डी मार्टच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झाल्यानंतर त्यावर गटर व चेंबरसाठी खोदकाम करण्यात आले. शहरात तयार रस्त्यांवर विविध ५५ ठिकाणी खोदकाम केल्याचे मक्तेदाराने कालच जाहीर केले. त्यात आता आणखी एकाची भर पडली..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT