Jalgaon Government Employees Society esakal
जळगाव

ग. स.च्या जामीनासह विविध कर्जावरील व्याजदरात कपात : चेअरमन उदय पाटील

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीच्या जामीन कर्जासह विविध कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीच्या जामीन कर्जासह विविध कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. यामुळे सभासदांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ‘सहकार’गटाने संचालक मंडळ निवडणुकीत सभासदांना दिलेल्या वचनाची पूर्ती केली आहे, अशी माहिती चेअरमन उदय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माहिती देताना उदय पाटील यांनी सांगितले, की ग. स. सोसाटीयटीच्या निवडणुकीस सभासदांनी ‘सहकार’ गटावर विश्‍वास ठेवून सर्वात जास्त जागा निवडून दिल्या. त्या बळावर आम्ही सत्ता स्थापन केली. निवडणुकीत सभासदांना आम्ही जे आश्‍वासन दिले होते. त्याची अवघ्या महिनाभरात पूर्तता केली आहे. जामीन व अपंग सभासद कर्जाचे व्याजदर १० टक्क्यांवरून आता ९ टक्के करण्यात आले आहे. वर्गणीचे आतील कर्ज व्याजदर ८ टक्क्यावरून ७.५ टक्के करण्यात आले त्यात अर्धा टक्के कपात करण्यात आला आहे. विशेष कर्ज व्याजदर दहा टक्क्यावरून साडे दहा टक्के करण्यात आले आहे. परिषद ॲडव्हान्स व्याजदर १३ टक्क्यांवरून ११.५० टक्के करण्यात आले आहे. विशेष कर्ज मर्यादेत रुपये ७५ हजार ते १ लाख रूपयेवरून वाढ करुन आता १५ लाख रुपये करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या ठेवीवरील व्याजदरात अर्धा टक्के वाढ करण्यात आली आहे. यावेळी उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, गटनेते अजबसिंग पाटील, संचालक महापौर जयश्री महाजन, अजबसिंग सोनवणे, भाईदास पाटील, महेश पाटील, रागिणी चव्हाण, अजय देशमुख, विश्‍वास पाटील, राम पवार गटाचे कोषाध्यक्ष व्ही. झेड. पाटील, व्यवस्थापक वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते.

‘सभासद अभिनव ठेव’ योजना

ज्येष्ठ अपंग व महिलांसाठी ठेवीवर प्रचलीत व्याजदरापेक्षा अर्धा टक्का जादा व्याजदर आकारण्यात येणार आहे. तर दरमहा ६.५ टक्के व्याज देणारी ‘सभासद अभिनव ठेव’ योजना सुरू करण्यात आली आहे. या शिवाय वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता घेउन पुढील वचनांची पूर्तता करण्यात येणार आहे, जनता अपघात विमा संरक्षण मर्यादा ३ लाखांवरून दहा लाख रुपये वाढ करणे, मयत सभासदाला शंभर टक्के कर्जमाफी देणे, मयत तसेच लवादी सभासदांच्या वारसांना दिलासा देण्यासाठी एक रकमी थकीत रक्कम भरण्यासाठी कर्ज वसुली योजना राबविण्यात येणार आहे. डीसीपीसी धारकांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. संस्थेचे सद्या ९५ कोटी भाग भांडवल आहे, ३४ हजार सभासद आहेत. ७२७ कोटी सभासद वर्गणी असून शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT