beaten sakal
जळगाव

जळगाव : मुलीच्या माहेरच्यांकडून व्याह्याला बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील एम. जे. कॉलेज (M. J. College) मागील लक्ष्मी नगर परिसरात राहणाऱ्या नामदेव भावराव गोपाळ ( वय-५५) यांना सुनेच्या माहेरच्या लोकांनी लोखंडी रॉड, काठीने डोक्यावर, हातापायावर जबर मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना (ता. ३०) रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

एम. जे. कॉलेज मागे गिरणा टाकी जवळ लक्ष्मी नगर परिसरात नामदेव भावराव गोपाळ ( वय-५५) कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार नामदेव गोपाळ यांच्या सुनेच्या तक्रारीवरून तिच्या माहेरच्या मंडळींनी निफाड येथून गुरुवारी (ता.३०) रेाज दुपारी जळगाव गाठले. तेथे नामदेव यांचा मुलगा सुनील यास त्याच्या सासरच्या मंडळींनी जाब विचारत मारहाण केली. मात्र, मुलासाठी नामदेव गोपाळ मध्ये आले. त्यात सुनीलचे शालक सागर पिंटू लोणारी (रा. कसबे सुकेणे ता.निफाड जि. नाशिक) याने लोखंडी रॉड नामदेव गोपाळ यांच्या डोक्यात मारला. तसेच हातापायावर देखील मारहाण केली. मारहाणीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

जिल्‍हारुग्णालयात उपचार सुरु

या मारहाणीत नामदेव गोपाळ जबर जखमी झाले. कुटुंबीयांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. येथे नातेवाईकांनी गर्दी केली होती. दरम्यान, रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असून संध्याकाळी जखमींचे जाबजबाब घेण्याचे काम सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT