भुसावळ : नगरपालिका इमारत esakal
जळगाव

भुसावळात महिला आरक्षण सोडतीने अनेकांची कोंडी

चेतन चौधरी

भुसावळ : नगरपालिका निवडणुकीत उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक माजी नगरसेवकांच्या मनसुब्यांवर महिला आरक्षण सोडतीने पाणी फेरले गेले आहे. कित्येकांना आरक्षणाचा फटका बसला. काहींना कुटुंबातील महिला सदस्याला संधी देण्याची, तर काहींना नवीन प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. परिणामी, काही जागांवर माजी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. सोडतीने दिग्गज इच्छुकांसह राजकीय पक्षांची कोंडी झाल्याचे चित्र आहे.

नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि खुल्या जागांसाठी महिला आरक्षण सोडतीनंतर प्रभागनिहाय स्थिती स्पष्ट झाली आहे. अनेकांचे राजकीय भवितव्य अधांतरी बनले. आज प्रांत कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. ४ जागा एससी, १ जागा एसटी व २० जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. यावेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने मुख्याधिकारी संदीप चिद्रवार उपस्थित होते.

भुसावळ नगरपरिषदेच्या २५ प्रभागांमध्ये ५० सदस्य निवडून येणार असून प्रत्येक प्रभागातून २ सदस्य निवडून येतील. २५ प्रभागांपैकी ८ प्रभागांमध्ये एससी तर २ प्रभागांमध्ये एसटी आरक्षण आहे. यामधील एसटी प्रभागात महिलांसाठी सोडत काढण्यात आली. यात प्रभाग ३ अ, प्रभाग ४ अ, प्रभाग ५ अ, प्रभाग १३ - अ या प्रभागांसाठी एसटी महिला उमेदवार असतील.
एसटीसाठी असलेल्या २ प्रभागांमधून प्रभाग ८ अ ही जागा एसटी महिलांसाठी राखीव झाली. सर्वसाधारणमध्ये २० जागा या महिलांसाठी राखीव आहे त्यामध्ये १ ब ,२ ब, ६ अ, ७ अ,९ अ,१० ब, ११ अ, १२ अ, १४ अ, १५ अ,१६ अ,१७ अ, १८ अ, १९ ब, २० अ,२१ ब,२२ अ, २३ अ, २४ अ २५ अ या जागा महिलांसाठी राखीव असतील.

प्रभागनिहाय आरक्षण

१. अ. अनुसूचित जाती
ब. सर्वसाधारण महिला

२. अ. अनुसूचित जाती
ब. सर्वसाधारण महिला

३. अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. सर्वसाधारण

४. अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. सर्वसाधारण

५. अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. सर्वसाधारण

६. अ. सर्वसाधरण महिला
ब. सर्वसाधारण (जनरल)

७. अ. सर्वसाधरण महिला
ब. सर्वसाधारण (जनरल)

८. अ अनुसूचित जमाती (महिला)
ब. सर्वसाधारण

९. अ सर्व साधरण महिला
ब. सर्वसाधारण जनरल

१०. अ अनुसूचित जाती
ब. सर्वसाधारण (महिला)

११. अ. सर्वसाधरण महिला
ब. सर्वसाधारण (जनरल)

१२. अ. सर्वसाधरण महिला
ब. सर्वसाधारण (जनरल)

१३. अ अनुसूचित जाती (महिला)
ब. सर्वसाधारण

१४. अ सर्व साधरण महिला
ब. सर्वसाधारण जनरल

१५. अ सर्व साधरण महिला
ब. सर्वसाधारण जनरल

१६. अ सर्वसाधरण महिला
ब. सर्वसाधारण जनरल

१७. अ सर्वसाधरण महिला
ब. सर्वसाधारण जनरल

१८. अ सर्व साधरण महिला
ब. सर्वसाधारण जनरल

१९. अ अनुसूचित जाती
ब. सर्वसाधारण महिला

२०. अ सर्व साधरण महिला
ब. सर्वसाधारण (जनरल )

२१. अ अनुसूचित जमाती
ब. सर्वसाधारण (महिला)

२२. अ सर्वसाधरण महिला
ब. सर्वसाधारण (जनरल )

२३. अ सर्वसाधरण महिला
ब. सर्वसाधारण (जनरल )

२४. अ सर्वसाधरण महिला
ब. सर्वसाधारण (जनरल)

२५. अ सर्वसाधरण महिला
ब. सर्वसाधारण (जनरल)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजार हिरव्या रंगात उघडला; निफ्टी 25,000च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

Miraj Dangal Update : मिरजेत तणाव प्रकरणी नवी अपडेट; पोलिस अधीक्षकांचा दोन वेळा आढावा, सध्याची परिस्थिती काय?

Diwali 2025 Shubh Shopping Guide: दिवाळीपूर्वी खरेदी करायचीय? मग 'हे' आहेत 10 शुभ मुहूर्त, वाचा एका क्लिकवर

Mumbai Accident : BMW-Porsche Car ची पश्चिम द्रुतगती महामार्गावर शर्यत; कार पलटी होऊन भीषण अपघात, चालक गंभीर जखमी

Gautami Patil : सगळीकडे गौतमचीच हवा ! सोनचाफा गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकुळ

SCROLL FOR NEXT