Jalgaon News : अमळनेर रस्त्यालगत असलेल्या पुरातन मरिमाता मंदिराची दुरवस्था झाली होती. त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. मात्र, येथील समाजसेवक नामदेव महाजन यांनी पुढाकार घेऊन येथील मरिमाता मंदिराची दुरुस्ती करून रंगरंगोटी केल्याने मंदिराचे रूप पालटले आहे.
सध्या नवरात्रीचे दिवस असल्याने या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी होत आहे.(renovation of ancient Marimata temple jalgaon news)
पारोळा येतील कुटीर रुग्णालय येथे मरिमाता मंदिर व अमळनेर रस्त्यालग व्यंकटेशनगर जवळील मरिमाता मंदिर हे देखील पुरातन आहे.
दरम्यान, मरिमाता मंदिराचे परिसरातील भाविकांनी दर्शन घ्यावे व भाविक भक्तांची दैनंदिन सेवा घडावी, या भावनेतून समाजसेवक नामदेव महाजन यांनी स्वतः पदरमोड करत मंदिराची रंगरंगोटी व डागडुजी केली. येणाऱ्या काळात परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने मंदिराच्या आजूबाजूला वृक्षांची लागवड करत परिसर नंदनवन करणार असल्याचे नामदेव महाजन यांनी ‘सकाळ’शी बोलताना.
..अशी आहे आख्यायिका
साधारणत: ७०- ७५ वर्षांपूर्वी मानमोडीचा आजार आला होता. त्याकाळी पुरेसे दवाखाने उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील अनेक जण या आजारामुळे मृत्युमुखी पडले होते. त्या काळी प्लेग राजा यांनी मानमोडी आजाराबाबत नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले असल्याची जुनी आख्यायिका आहे.
प्लेग राजाचे शहरावर उपकार असल्यामुळे मरिमाता मंदिराजवळ प्लेग राजा यांची मूर्ती देखील स्थापन करण्यात आली आहे, असे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, शहरातील पुरातन मरिमाता मंदिर हे भाविकांसाठी लक्षवेधी ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.