Ward Reservation Draw  esakal
जळगाव

भडगाव पालिकेच्या प्रभागांचे आरक्षण जाहीर

सुधाकर पाटील

भडगाव (जि. जळगाव) : येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृह चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत (Reservation of wards draw) आज सकाळी अकराला काढण्यात आली. या सोडतीनंतर ‘कही खुशी कही गम’चे चित्र पहायला मिळाले. (Reservation of wards of Bhadgaon Municipality announced Jalgaon News)

सुरवातीला मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी प्रभाग आरक्षण संदर्भातील माहिती उपस्थितांना दिली. भडगाव शहरातील १२ प्रभागात प्रत्येकी २ याप्रमाणे २४ जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीकरिता १, अनुसूचित जमातीकरिता २ व व उर्वरित २१ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रभाग १ मध्ये अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग ११ मध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला, प्रभाग १२ मध्ये अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले असून उर्वरित प्रभाग २ ते १० मध्ये प्रत्येकी एक जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर दुसरी सर्वसाधारण राहणार आहे. आरक्षण सोडतीची चिठ्ठी टोणगाव जिल्हा परिषदेच्या शाळच्या विद्यार्थिनी हर्षदा वाडेकर व मिताली पाटील यांनी काढल्या. आरक्षण सभेचे कामकाज नगरपरिषद अधीक्षक परमेश्वर तावडे, नितीन पाटील यांनी पार पाडले. सभेसाठी विविध पक्षांचे इच्छूक उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT