jalgaon sakal
जळगाव

जळगाव राष्ट्रवादीत ‘राजीनामा’नाट्य

महानगराध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर १२ फ्रंटल प्रमुखांनी सोडले पद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव महानगरमध्ये अंतर्गत घमासान सुरू झाले आहे. महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या राजीनाम्यानंतर महानगरातील १२ फ्रंटल अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येऊन खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपला राजीनामा अचानक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविल्याने खळबळ उडाली होती.

वरिष्ठांकडून सूचना

याबाबत अधिक माहिती घेतली असता, पाटील यांची पक्षाने प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. एका व्यक्तीकडे दोन पदे ठेवता येत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा हे प्रदेशकडून सूचित करण्यात येत होते. त्यांना महानगर अध्यक्ष पदावर ठेवावे अशी मागणीही काही नेत्याकडून करण्यात आली.

अखेर राजीनामा

मात्र, त्याबाबत वरिष्ठ नेत्याकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने अखेर पाटील यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच स्थानिक नेत्यांच्या तक्रारीमुळे आपल्याला काम करता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

बारा फ्रंटलवर पडसाद

त्यांच्या राजीनाम्यानंतर शुक्रवारी पक्षाच्या बारा फ्रंटल अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यात उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पना पाटील, युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, सामाजिक न्याय अध्यक्ष जितेंद्र चांगरे, पदवीधर अध्यक्ष अनिल पाटील, सचिव ॲड. कृणाल पवार, युवक कार्यअध्यक्ष अक्षय वंजारी, युवती अध्यक्ष आरोही नेवे, वक्ता सेलचे अध्यक्ष रमेश भोळे, सांस्कृतिक सेल अध्यक्ष गौरव लवंगरे, ओबीसी सेल अध्यक्ष कौशल काकर, शिक्षक आघाडी अध्यक्ष हेमंत सोनार यांचा समावेश आहे.

स्थानिक नेत्यांच्या तक्रारी

महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपण विधानसभा निवडणुकीपासून शहरात चांगले काम करीत आहोत. आपले काय चुकले हे न सांगता आपली प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. काम करणाऱ्या व्यक्तीबाबत स्थानिक काही नेत्यांच्या तक्रारीवरून असे होत असेल तर हे चुकीचे आहे. त्यामुळेच पदाधिकाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

Marathi Language : इस्रायलमध्ये मराठीचा झेंडा! इवा तळेगावकरांनी परदेशात जपली मातृभाषेची ओळख

SCROLL FOR NEXT