Child Marriage
Child Marriage esakal
जळगाव

Jalgaon News : लग्नावेळी मुलीचे वय 18; तपासणीची जबाबदारी मंदिर, मंगलकार्यालयांवर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बाल विवाह मुक्त जळगाव जिल्हा होण्यासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून आपल्या मंगल कार्यालयांमध्ये व विविध धार्मिक स्थळी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार मुलीचे वय १८ वर्ष व मुलाचे वय २१ वर्षे झाल्याशिवाय विवाह होणार नाही.

शालेय पुरावा घेतल्याशिवाय मंगल कार्यालयामध्ये/मंदिरामध्ये कोणतीही लग्नाची नोंदणी होणार नाहीत. ( responsibility of checking age of girl at time of marriage is 18 jalgaon news)

बाल विवाह घडून येणार नाहीत याबाबत कटाक्षाने पालन व्हावे, असे आदेश जिल्हाधिकारी, जिल्हा बाल सरंक्षण कक्षाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी आज काढले आहेत. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये बाल विवाह लावल्यास तसेच बाल विवाह लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देण्याऱ्यास शिक्षा विहित करण्यात आलेली आहे.

यामध्ये सर्वं नागरिक, माता -पिता, पालक, प्रिंटिंग प्रेस, पुरोहित (सर्वधर्मीय), फोटोग्राफर, आचारी, मंडप डेकोरेशन, केटरर्स, व्यवस्थापक मंगल कार्यालय तसेच संबंधित सर्व व्यावसायिक यांनी बालविवाहास चालना देणारी कोणतीही कृती केल्यास, तो विधिपूर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणा केल्यास, बाल विवाहास उपस्थित राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्तींनाही शिक्षा होवू शकते.

अशी व्यक्ती दोन वर्षापर्यंत सश्रम कारावासाच्या शिक्षेस आणि एक लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे. मंगल कार्यालयात व धार्मिक स्थळी मुला -मुलींचे विवाह होत असताना मुलीचे वय अठरा, मुलाचे वय २१ पूर्ण झाले असल्याची पडताळणी शालेय कागदपत्र पाहूनच करावी.

शिवाय मंगल कार्यालयाच्या/धार्मीकस्थळांच्या दर्शनी भागात बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ चे माहिती फलक दर्शनी भागावर लावण्यात यावी. असे घडत असल्यास संबंधित पोलिस ठाणे, महिला हेल्पलाइन क्रमांक १०९१ व १८१ यावर संपर्क साधावा.

वरील आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड सहिंतेचे कलम १८८ प्रमाणे संबंधित व्यवस्थापक यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT