Idols of Ram, Sita and Lakshmana in ancient Ram Temple in Ram Mandir Ward. esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळला प्राचीन श्रीराम मंदिराचा जिर्णोद्धार

श्री रामचंद्रजी महाराज संस्थान ट्रस्टचे श्री राम मंदिर हे लोकसहभागातून जिर्णोद्धार झालेले प्राचीन मंदिर आहे. मंदिराला गजानन महाराजा पासून शंकराचार्यां पर्यंत अनेकांनी भेटी दिल्याचे सांगितले जाते.

श्रीकांत जोशी

Jalgaon News : येथील श्री रामचंद्रजी महाराज संस्थान ट्रस्टचे श्री राम मंदिर हे लोकसहभागातून जिर्णोद्धार झालेले प्राचीन मंदिर आहे. मंदिराला गजानन महाराजा पासून शंकराचार्यां पर्यंत अनेकांनी भेटी दिल्याचे सांगितले जाते.

राम मंदिर वॉर्डातील हे मंदिर दिडशे वर्षांपूर्वींचे आहे. शासनदरबारी मात्र १८८७ च्या नोंदीचे ब्रिटिशकालीन प्रमाणपत्र पुरावा मंदिर ट्रस्ट कडे आहे. (Restoration of ancient Shriram temple in Bhusawal jalgaon news)

मंदिराची स्थापना नेमकी कोणी केली याचा उल्लेख नसला तरी गोदु ताई गणेश जोशी यांच्याकडे या मंदिराची मालकी होती. १९६० मध्ये त्यांनी मृत्युपत्र करून मंदिराचा ताबा श्रीवल्लभ महादेव चौक यांच्याकडे दिला त्यानंतर त्यांचे वारस पुत्र श्रीराम श्रीवल्लभ चौक उर्फ भाऊ यांच्या कडे मालकी हक्क आला.‌

त्यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाल्याने त्यांच्या पत्नी व मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा सरीता चौक मंदिराची व्यवस्था पाहतात.

प्राचीन मंदिर सागवानी

प्राचीन मंदिर सागवानी लाकडाचे होते. मोठ मोठे लाकडी खांब मंदिराची शोभा वाढवत. भिंतींवर रामायणातील विविध प्रसंग रंगवलेले होते.

चार वर्षांपूर्वी पावसाचे पाणी मुरल्याने मंदिराचा एक भाग कोसळला त्यामुळे देणगीतून जिर्णोद्धार झाला. घुमट व कलश अपूर्ण होता. त्याचेही काम आता पूर्ण झाले उद्या सोमवारी (ता. २२) सकाळी होणार उद्घाटन आहे.

गजानन महाराजांची भेट

मंदिराला शेगाव येथील संत गजानन महाराज, करवीर पिठाचे आद्य शंकराचार्य यांनी भेट दिल्या आहेत. साखरखेडा (ता. अकोला) येथील प्रल्हाद महाराजांसह अनेक साधू संत,कीर्तनकारांनी मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले.

या मंदिरात अनेक सत्संग होतात अनिरुद्ध बापूंची उपासना, कलावती आईची बाल उपासना भजन ,भागवत सप्ताह , सत्संग, कीर्तन यासह विविध आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी वर्षभरात सुरु असतात.मंदिर आवारातील आमच्या घर दुरुस्तीचे काम ठेकेदार उस्मानभाई खाटीक यांना सांगायचो.

जिर्णोद्धार मंदिराचे नवीन डिझाईन जळगाव येथील इंजिनिअर राजेश कुलकर्णी यांनी केले मात्र बांधकामाची जबाबदारी उस्मानभाईंवर सोपवली. त्यांनी ही जबाबदारी निष्ठेने पूर्ण केली. असे ट्रस्टच्या अध्यक्षा सरिता चौक यांनी सांगितले.

"धान्याचे दुकान मंदिराच्या समोरच होते. वडील बिरजीचंद लाहोटी सकाळी दुकान उघडण्याच्या आधी मंदिरात जाऊन दर्शन घेत. लाहोटी परिवाराचे या मंदिराशी ऋणानुबंध ७० वर्षांपासून आहे. आजही मी न चुकता रोज दर्शनासाठी येतो." - राध्येश्याम लाहोटी ( मंदिराचे संस्था चालक )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT