जळगाव

जळगाव जिल्ह्याची महसूल वसुली ६२ टक्के; जळगावसह आठ तालुके ‘रेड झोन’मध्ये

देविदास वाणी

जळगाव ः यंदा कोरोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाला महसूल वसुलीत अडचणी येत असल्याची चिन्हे आहेत. महसूल वसुलीच्या अखेरचा मार्च महिना सुरू झाला तरी अद्याप जिल्ह्याची महसूल वसुली ६२.४७ टक्के झाली आहे. यात जळगावसह अमळनेर, रावेर, पाचोरा, पारोळा, चाळीसगाव, मुक्ताईनगर या तालुक्यांची वसुली साठ टक्क्यांच्या आत झाल्याने हे तालुके वसुलीच्या ‘रेडझोन’मध्ये आहेत. 


जिल्ह्याला यंदा १८५ कोटी सहा लाख वसुलीचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत ११५ कोटी ५९ लाख ९२ हजार म्हणजे एकूण उद्दिष्टांच्या ६२.४७ टक्के वसुली झाली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रकारच्या गौण खजिनाची विक्री, विविध जागांवर विविध प्रकारचे कर लावले जातात, शेतसारा आदीद्वारे करवसुली केली जाते. यंदा वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे करवसुली थांबली होती. नुकतेच वाळूचे ठेकेही लिलावात गेल्याने काही तालुक्यांत महसूल वसुलीचे आकडे वाढले आहेत, असे असले तरी चाळीस टक्के करवसुली बाकी आहेच. त्या वसुलीसाठी तलाठी, तहसीलदार, मंडळाधिकारी यांना कसरत करावी लागणार आहे. एकीकडे विविध प्रकारचे दाखले वितरण तर दुसरीकडे वसुली अशी दुहेरी जबाबदाऱ्या महसूल विभागाला कराव्या लागणार आहेत. 

तालुकानिहाय झालेली वसुली अशी 
तालुका--एकूण उद्दिष्ट--एकूण वसुली--टक्केवारी 

अमळनेर--१२ कोटी--४ कोटी ७१ लाख ४५ हजार--३९.२९ 
रावेर--८ कोटी ७५ लाख--३ कोटी ९९ लाख २८ हजार--४५.६३ 
पाचोरा--१२ कोटी ५० लाख--५ कोटी ८२ लाख ८० हजार- ४६.६२ 
जळगाव--३६ कोटी ३५ लाख--१९ कोटी ७७ लाख ३४ हजार- ५४.४० 
पारोळा--५ कोटी ५० लाख--३ कोटी ४ लाख ३० हजार- ५५.३३ 
भडगाव--५ कोटी ५० लाख--३ कोटी ७ लाख ९८ हजार- ५६ 
चाळीसगाव--१७ कोटी २१ लाख--१० कोटी १६ लाख ९५ हजार-५९.०९ 
मुक्ताईनगर--१० कोटी २५ लाख--६ कोटी ११ लाख ९५ हजार- ५९.४१ 
भुसावळ--१६ कोटी ७५ लाख--१० कोटी ८२ लाख २ हजार- ६४.६० 
जामनेर--१४ कोटी १५ लाख-- ९ कोटी ३२ लाख ७६ हजार- ६५.९२ 
बोदवड-- ५ कोटी --३ कोटी ६५ लाख ४२ हजार- ७३.०८ 
धरणगाव--९ कोटी ८० लाख--७ कोटी ७० लाख ३७ हजार- ७८.६१ 
चोपडा--९ कोटी --७ कोटी ३७ लाख ९२ हजार- ८१.९९ 
यावल--१० कोटी -- ८ कोटी २८ लाख १ हजार- ८२.८० 
एरंडोल--१२ कोटी ३० लाख--११ कोटी ७२ लाख २८ हजार-९५.३१ 
एकूण--१८५ कोटी ६ लाख--११५ कोटी ५९ लाख ९२ हजार--६२.४१ 

एरंडोल आघाडीवर 
चोपडा, यावल, एरंडोल या तालुक्यांनी ८० टक्क्यांवर वसुली केल्याने ते ‘ग्रीन लिस्ट’मध्ये आहेत. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक ११ कोटी ७२ लाखांची वसुली आल्याने तो तालुका वसुलीत आघाडीवर आहे.

यंदा कोरोना कामामुळे वसुलीवर परिणाम झाला आहे. महिनाभरात उर्वरित वसुली शंभर टक्के होईल. सर्व महसूल विभाग वसुलीसाठी प्रयत्नरत आहे. अनेक ठिकाणी वसुलीच्या मोठ्या कारवाया होत आहेत. 
रवींद्र भारदे, 
महसूल उपजिल्हाधिकारी 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT