revenue department members esakal
जळगाव

तहसिलदार उतरले रस्त्यावर; महसूल विभाग ‘ॲक्शन मोड’वर

देवीदास वाणी

जळगाव : गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा (Illegal sand extraction) सुरू आहे. या वाळूमाफियांच्या (Sand MAfia) मुसक्या आवळण्यासाठी व इतर जिल्ह्यातील पावती दाखवून वाळू नेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी, ‘डीएमओ’सह तहसीलदार (Tahsildar) सोमवारी (ता. ६) थेट रस्त्यावर उतरले होते. (Revenue Department in Action Mode against illegal Sand trafficking Jalgaon News)

जळगाव प्रांताधिकारी महेश सुधाळकर, जिल्हा गौण खनिज अधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गिरणा नदीपात्रापासून तर शहरातील विविध चौकांमध्ये आज दिवसभर झाडाझडती करीत वाळू नेणाऱ्या डंपर, ट्रॅक्टरवर कारवाई केली.

गिरणा नदीपात्रातील विविध ठिकाणचे लिलाव झालेले आहेत. असे असले तरी वाळूमाफिया क्षमतेपेक्षा अधिक वाळूचा उपसा करून वाळू वाहतूक करतानाचे चित्र आहे. यावर कारवाईसाठी आज सकाळपासूनच महसूलचे अधिकारी कामाला लागले होते. यामुळे दिवसभरात नदीपात्रातून पावती असो वा नसो एकही वाळूचा डंपर, ट्रक्टर जाऊ द्यायचा नाही, असा नियमच महसूलने केला होता.

अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक, कालिंकामाता चौक, खोटेनगर पेट्रोलपंप, गिरणा नदीपात्रात वाहने येण्याजाण्याच्या रस्त्यावर महसूलचे अधिकारी (मंडळाधिकारी, तलाठी, कारकून) कारवाईसाठी उभे होते. वाळू वाहतूक करणाऱ्यांना याची माहिती मिळताच आज नदीपात्रातून उपसा करण्यासाठी डंपर, ट्रक, ट्रॅक्टर आले नसल्याचे सांगण्यात आले.

अवैध साठा जप्त

वाळूमाफियांनी काटेरी झाडाझुडूपात साठा करून ठेवलेला सुमारे ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा महसूल विभागाने सोमवारी जप्त केला. एक मोटारसायकलही जप्त केली आहे.

महसूल विभागाला कामाचा व्याप

महसूल विभागाला दररोज कामाचा व्याप असतो. सातबारा देणे, दाखले देणे, नोंदी घेणे, आता नुकतेच सुरू झालेली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची कामे, पंचायत समिती, जिल्हा परिषद गट, गणांच्या प्रभागरचनेची कामे आदी अनेक कामांचा व्याप आहे. त्यात वाळू चोरट्यांचा हैदोस सुरू आहे. महसूल प्रशासनात अनेक पदे रिक्त आहेत. जर पदे भरली तर सर्व ठिकाणी महसूल अधिकारी, कर्मचारी निंयत्रण ठेवू शकतील.

मार्गावर चर खोदल्यावरही वाळू उपसा

अवैधरित्या वाळू नेणारे ज्या मार्गाने वाळूचे डंपर, ट्रॅक्टर नेतात त्या मार्गावर महसूल विभागाने ठिकठिकाणी मोठे चर खोदून ठेवले आहेत. मोठे वाहन जाऊ नये, यासाठी लोखंडी खांबही उभे केले. मात्र वाळू चोरांनी चर बुजविले, खांबही तोडून वाळू वाहून नेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT