marathi news satara crime murder painter police 
जळगाव

जळगाव : तांबापुरा दंगलीत पोलिसांवर उलटला जमाव; वेगवेगळे गुन्हे दाखल

लहान मुलांच्या भांडणात दगडफेक केल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन तांबापुरात रात्री दंगल उसळली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तांबापुरातील रहिवासी तथा तीन दिवसांपूर्वीच जेलमधून सुटलेल्या संशयिताने लहान मुलांच्या भांडणात दगडफेक केल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन तांबापुरात रात्री दंगल उसळली. या दंगलीत एका तरुणीच्या घरावर हल्ला झाल्याने मारहाणीत नाकाचे हाड मोडले. तर, हुल्लडबाजांना पांगवणाऱ्या पोलिसांवर जमावाने चाल केल्याने कर्मचारी जखमी झाला. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे एमआयडीसी पोलिसात दाखल करण्यात आले आहे. (Riot in Jalgaon Tambapura area)

शहरातील तांबापुरा परिसरातील गवळीवाडा-फुकटपुराच्या मध्यभागी असलेल्या बिस्मील्ला चौकात किरकोळ वादातून मंगळवारी (ता. १७) रात्री दोन गट समोरासमोर आल्याने हाणामारी होऊन तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत स्थानिक रहिवाशांच्या घरांवर दगडांचा मारा झाल्याने नुकसान झाले आहे. तर एका महिलेच्या घरावर हल्ला चढवण्यात आला असून घरातील २२ वर्षीय तरुणीला दंगेखोरांनी लक्ष करत मारहाण करून तिच्या नाकाचे हाड मोडले. शिरीन बी शेख युनूस असे जखमी तरुणीचे नाव असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी तरुणीचा जबाब नोंदवण्यात येऊन १७ संशयितांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात प्राणघातक हल्ल्यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस पार्टीवर दगडफेक

तांबापुरा दंगलीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्यात हजर पोलिस नाईक मुद्दस्सर काझी, इम्रान सैय्यद, राजेंद्र ठाकूर, रमेश अहिरे, जमीर शेख, अशांचा एक गट मच्छीबाजाराच्या दिशेने बिस्मील्ला चौकात पोचला असताना जमावाला पांगवत असताना गर्दीतील संशयितांनी पोलिस पार्टीवर दगड-विटा, काचेच्या बाटल्यांसह लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. यात पोलिस कर्मचारी जमीर शेख यांच्या डोक्यात समीर काकर याने फरशी फेकून मारली. मात्र, त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत बचाव केल्याने त्यांच्या हातावर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या जबाबावरून ३० ते ४० संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी भेट देत दंगलीत सहभागी संशयितांच्या अटकेच्या सूचना दिल्यानंतर अटकसत्राला सुरवात करण्यात आली.

दोन्ही गटातील ३०-४० संशयित

एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असून त्यात समीर काकर, सैय्यद सलमान, कल्पेश सोनार, दीपक, अजय, राहुल, गुलाब, वास्तव, सोमा, नितील, लखल, गोविंदा गायकवाड, भिला हटकर, विठ्ठल हटकर, इमरान तडवी, शाहरुख खाटीक, सलमान मोहम्मद कासीम, रिजवान ऊर्फ काल्या गयासोद्दीन शेख यांच्यासह इतरांचा जखमींच्या जबाबात समावेश आहे. दाखल गुन्ह्यात पोलिसांनी १६ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांना गुरुवारी (ता. १९) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT