Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : रस्तालूट करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : अमळनेर - चोपडा रस्त्यावर झालेल्या रस्त्यालूट करणाऱ्या तीन जणांना अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तीन जणांचा शोध पोलिस घेत आहेत. (Road looting gang in police custody Jalgaon Crime News)

अमळनेर - चोपडा रस्त्यावरील नवीन रेल्वे पुलाजवळ ५ नोव्हेंबरला सहा जणांनी रस्त्यावर लोखंडी रॉड व मोठमोठे दगड रस्त्यावर टाकून एका टँकरचालकाला मारहाण करून लूट केली होती. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारचे गुन्हे आधी घडले होते. मात्र याबाबत कोणीही तक्रार दाखल केलेली नव्हती. तर लुटमार करणाऱ्या टोळीविरुद्ध कोणताही पुरावा उपलब्ध होत नव्हता.

पथकातील पोलिस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलिस कर्मचारी मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, राहुल पाटील, राजेंद्र देशमाने आदींनी असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची कार्यपद्धती तपासली. याबाबत एकाची विचारपूस केली असता त्याने पथकाला उडवाउडवीची उत्तरे दिली होती. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी त्यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार अजून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या तीन जणांचा शोध सुरू असल्याने ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे पोलिस पथकाने जाहीर केले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT