Looted cash esakal
जळगाव

चोपडा-शिरपूर रस्त्यावर रस्तालूट; 60 हजारांचा ऐवज लंपास

या दरोड्यातील सातही जणांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १४ तासात जेरबंद करण्यात यश आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

चोपडा (जि. जळगाव) : शहराकडून शिरपूरकडे कापसाचे बियाणे भरलेल्या ट्रकला दरोडेखोरांनी बुधगाव फाट्याजवळील हॉटेल रंगतजवळ अडवून गाडीच्या काचा फोडल्या. चालक व क्लिनर यास दमदाटी करून गाडीच्या डिक्कीतील रोख रक्कम ५० हजार रुपये व पाच हजार किमतीच्या दोन बॅटरी असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी (ता. २५) पहाटे तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोड्यातील सातही जणांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १४ तासात जेरबंद करण्यात यश आले आहे.

मलकापूर येथून अंकुर कापसाचे बियाणे भरून ट्रक (जीजे ०३, एटी ०२१८) अहमदाबाद येथे जात होता. या ट्रकचा पाठलाग करत मागून येणारी टाटा मॅजिक गाडीने (एमएच १९, एएक्स ८२२५) ट्रकला ओव्हरटेक करून ट्रकच्या पुढे वाहन आडवे लावले. टाटा मॅजिकमधील रवींद्र राजेंद्र कोळी (२३), राहुल एकनाथ पाटील ( १९), सोनू उर्फ ज्ञानेश्वर कोळी (२३), भुरा उर्फ धनगराज सोनवणे (२३), गजानन किशोर पाटील (२१), रवींद्र सुरेश कोळी (२९), अभिषेक रावसाहेब कोळी (२३) (सर्व रा. वर्डी, ता. चोपडा) हे सातही जणांनी ट्रकचालक व क्लीनर यांना दमदाटी करत ट्रकच्या काचा फोडून, ट्रकच्या डिक्कीतील रोख ५० हजार तसेच पाच हजार किमतीच्या दोन बॅटरी असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन जात होते. याबाबत गस्तीवर असलेल्या ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा टाटा मॅजिक गाडीचा चालक रवींद्र कोळी हा पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याला इतरांचे नावे विचारले असता त्याने वरील संशयितांची नावे सांगितली. घटनेनंतर अवघ्या १४ तासांत चोपडा पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले.

या संदर्भात हेमूभाई पोपटभाई अनियालिया (वय ३९, रा. देवलिया, ता. थान, जि. सुरेंद्रनगर, गुजरात) यांच्या फिर्यादीनुसार वरील सात जणांवर चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे तपास करीत आहेत. सातही जणांना गुरुवारी (ता. २६) चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT