जळगाव

Jalgaon PWD News : ‘साबांवि’च्या नावाने बोंब! मनपाचे कामही बोगसच; महिन्यात उखडले रस्ते

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon PWD News : शासनाच्या निधीतून रस्त्याची कामे होत नसल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे महापालिकेचे अधिकारी व नगरसेवक बोंब मारत आहेत. पण, दुसरीकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाअंतर्गत मक्तेदारांनी केलेल्या रस्त्याची कामेही दर्जाहिन व जनतेला त्रासदायक आहेत.

अनेक भागातील रस्ते अवघ्या महिनाभरात उखडले आहेत. त्यावर अद्याप सिलकोटही झालेले नाही. परंतु, मक्तेदाराचे मात्र चांगभले झाल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिकेच्या फंडातून शहरात अनेक रस्ते तयार करण्यात आले आहेत. शहर अभियंत्यातर्फे या रस्त्याच्या प्रभागनिहाय निवीदा काढण्यात आल्या आहेत. (road works done construction department of Municipal Corporation are also destroyed jalgaon news)

त्यानुसार मक्तेदाराला काम देण्यात आले. त्यानंतर या रस्त्याची कामे झाली आहेत. मात्र, या रस्त्याची कामे अत्यंत दर्जाहीन आहेत. खडीचा केवळ एक लेअर टाकून त्यावर डांबरीकरण करून जाड खडी टाकण्यात आली आहे.

विशेष म्हणजे त्यावर कोणत्याही प्रकारचे सीलकोट केलेले नाही. शहरातील शिवाजीनगर भागात टी. टी. साळुंखे चौकाकडून, लाकडी वखारीपर्यंतचा मुख्य रस्ता, नवीपेठेतील वल्लभदास वालजी वाचनालयाचा मागील रस्ता, चांदणी हॉटेलचा रस्ता, तहसीलदार कचेरीचा रस्ता, बळीराम पेठेतील वैभव कापड दुकानाजवळील रस्ता, तसेच शहरातील इतर भागात महापालिकेने केलेल्या कोणत्याच रस्त्यावर सीलकोट करण्यात आलेले नाही.

पाहणी न करताच बिले मंजूर

महापालिकेच्या मक्तेदारांनी महापालिका फंडातून केलेले रस्ते अवघ्या महिनाभरात उखडले आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी या मक्तेदारांची बिलावर स्वाक्षरी केली असल्याचेही सांगण्यात येत आहे. कामाची कोणतीही पाहणी न करताच शहरअभियंत्यांनी ही बिले मंजूर कशी केली? असा प्रश्‍नही आता निर्माण झाला आहे.

आयुक्तांची तपासणी थंड बस्त्यात?

महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आयुक्तपद घेताच तपासणी मशीन घेवून शहरातील रस्त्यांची तपासणी सुरू केली होती. ज्या ठिकाणी कामाचा दर्जा चांगला नव्हता, त्या मक्तेदारांना दंडही केला. तसेच काहींना पुन्हा काम करण्याचे आदेश दिले होते. मग आयुक्तांची ही तपासणी थंड बस्त्यात का पडली? असा प्रश्‍नही आता जळगावकर विचारीत आहेत.

पद मिळाल्यानंतर आयुक्तांचा तो केवळ दिखावा होता काय? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. आयुक्त या रस्त्याची पाहणी करून या मक्तेदारावर कारवाई करून रस्त्याचे काम चांगले करण्याचे आदेश देतील काय? याकडेच आता लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT