RPF in Action  esakal
जळगाव

जळगाव : वाळू चोरी रोखण्यासाठी RPF चे पथक

देवीदास वाणी

जळगाव : येथून जवळच असलेल्या बांभोरी, निमखेडी रेल्वे पुलाखालून गिरणानदी जाते. रेल्वेच्या पुलाखाली वाळू माफियांनी (Sand Mafia) वाळू पोखरल्याने या पुलाला धोका निर्माण होवू शकतो. यामुळे रेल्वेने पुलाच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल (Railway Security Force) (आरपीएफ)चे पथक चोवीस तास या पुलाखाली तैनात ठेवावे, पुलाकडे मोठी वाहने येणार नाहीत, यासाठी बॅरिकेटस ठेवावेत आदी निर्णय शनिवारी (ता. २५) महसूल, रेल्वे विभाग, आरपीएफ, पोलिस (Police), आरटीओ (RTO) विभागाने घेतला आहे. (RPF team to prevent sand theft Jalgaon News)

पिलरची केली पाहणी

पाचही विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी थेट गिरणा नदीपात्रात जाऊन निमखेडी, बांभोरी रेल्वे पुलाची पाहणी केली. वाळू माफियांनी पुलाच्या पिलरजवळील वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याचे दिसून आले. पिलरजवळ जर अधिक उपसा झाला तर पुलाच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो. यामुळे रेल्वेने याबाबतीत पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. महसूल, पोलिस यंत्रणा वाळू चोरीवर आळा घालण्यासाठी उपाय योजना करीत असते. मात्र पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने रेल्वेने पुलाची सुरक्षा स्वतः करावी असे सूचविण्यात आले. त्यावर आरपीएफचे एक पथक या दोन्ही पुलाखाली चोवीस तास तैनात ठेवण्याचे ठरविण्यात आले.

सीसीटीव्हीची मागणी

सोबतच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. पुलाजवळील परिसरात मोठी वाहने येणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याचे सूचविण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, सहाय्यक पोलिस अधीक्षक वाकचौरे, तहसिलदार नामदेव पाटील, पोलिस निरीक्षक कुंभार, सहाय्यक निरीक्षक बुवा, रेल्वेचे अभियंता महेंद्र पाटील, मेश्राम, आरपीएफचे अधिकारी, आरटीओ विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT