जळगाव : कुठलीही निविदा प्रक्रिया न राबवता किंवा पूर्वपरवानगी न घेता १८०० किलो अखाद्य तुपाचा चॉकलेट निर्मात्यांना विक्री केल्याचा गंभीर प्रकार तपासात उघडकीस आला आहे. शहर पोलिसांनी बी-ग्रेड तुपाचा चॉकलेटसाठी वापर करणाऱ्या व्यावसायिक रवी मदनलाल अग्रवाल याला अकोला येथून ताब्यात घेतल्याने अटकेतील संशयितांची संख्या पाच झाली असून लिमयेसह चौघांची पाच दिवस पेालिस कोठडीत रवानगी झाली आहे. (Sale of inedible ghee for making chocolate across state 5 days custody for four jalgaon Latest Crime News)
जिल्हा दूध संघात तयार होणाऱ्या १ हजार ८०० किलो अखाद्य तुपाची निखिल नेहते यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी कुठल्याही निविदा प्रक्रिया न राबवता आणि पूर्वपरवानगी न घेता स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करून जिल्हा दूध संघाची फसवणूक केल्याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात प्रभारी कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. काल सोमवारी (ता.१४) कार्यकारी संचालक मनोज लिमये, हरि पाटील, किशोर पाटील, अनिल अग्रवाल यांना अटक कऱण्यात आली.
अटकेतील चौघांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात येवुन सकाळी त्यांना जिल्हा न्यायालयात न्या. आर.वाय.खंडारे यांच्या न्यायालात हजर करणयात आले. संशयीतावरील आरोप, गुन्ह्याचे स्वरुप आणि कटकारस्थाची पद्धत या अनुषंगाने तपासाला जास्तीत जास्त दिवस मिळावे यासाठी तपासाधीकार्यांनी पोलिस कोठडीची मागणी केल्याने न्यायालयाने सलग पाच दिवसांची(ता. १९) पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिस रात्रीतून अकोल्यात धडकले
अखाद्य तुपाची अनिल अग्रवालसह अकोल्यातील रवी अग्रवाल याला सुध्दा विक्री झाल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाल्यावर निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार ओमप्रकाश सोनी, तेजस मराठे व इतर रात्रीतून अकोल्यात धडकले. रवी अग्रवाल याला ताब्यता घेत लगोलग पोलिस दिवस उजाडताच जळगावकडे निघाले. अटकेची प्रक्रिया पूर्ण करुन त्याला अटक करण्यात आली. रवी अग्रवाल अखाद्य तुपाचा चॉकलेट बनवण्यासाठी वापर करत असल्याचे समोर आले आहे.
मेरा..नंबर कब आयेगा!
जिल्हा दूध संघ अपहार आणि चोरीच्या वेगवेगळ्या तक्रारी अर्जांचा एकत्रित गुन्हा सरकारपक्षातर्फे दाखल होवून अटकेतील कार्यकारी संचालक मनोज लिमये, हरी पाटील, किशोर पाटील, अनिल अग्रवाल यांच्यासह रवी मदनलाल अग्रवाल (अकोला) या पाचव्या संशयिताला अटक झाली आहे. परिणामी आता आपला नंबर तर नाही ना अशी भिती संबंधितांना लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.