जळगाव : यावल पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी दोन वर्षांपासून फरार वाळू व्यावसायिक गोकूळ ऊर्फ डॉन रघुनाथ कोळी, (रा. भोलाणे, ता. जि. जळगाव) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. (sand Don cheating with police for 2 years jalgaon Latest Marathi News)
नाशिक परिक्षेत्रात महानिरीक्षक डॉ. बी. जे. शेखर यांच्या सूचनेवरून १५ ते ३० जुलै दरम्यान वॉण्टेड, फरार आरोपींची शोध मोहीम राबवली जात आहे. यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत शासकीय नोकरांना दमबाजी करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाळू व्यावसायिक गोकूळ उर्फ डॉन रघुनाथ कोळी (रा. भोलाणे, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल होताच गोकूळ ऊर्फ डॉन याने घरदार सोडून पळ काढल्याने तो सापडून येत नव्हता. भालाणे येथील घर सोडून त्याने चक्क जळगावी बस्तान हलवले होते. जळगाव शहरातील जैनाबाद कांचननगर परिसरात गोकूळ ऊर्फ डॉन वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.
त्यांच्या पथकातील जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे यांच्या पथकाने कांचननगरात पाळत ठेवून संशयित गोकूळ ऊर्फ डॉन याला सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध वाळू चोरीसह इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोन वर्षे गुंगारा
गुन्हे दाखल असल्याने यावल पोलिस त्याच्या अटकेसाठी भोलाणे येथील राहत्या घरी चकरा मारू लागले. मात्र तो घरीच सापडत नव्हता तर, ग्रामस्थांनी त्याने गाव सोडल्याची माहिती पोलिसांना दिली.
तब्बल दोन वर्षे त्याचा शोध सुरु असताना तो, जळगावात बस्तान मांडून होता. संशयित गोकूळ ऊर्फ डॉन कोळी याचा शोध सुरु असतानाच तो, कांचननगरात वास्तव्याला असल्याच्या गुप्त माहितीवरून त्याच्या घराबाहेर सापळा रचून त्याला अटक केली. संशयिताला यावल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.