Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : मंडलाधिकाऱ्याला डंपरमधून बाहरे फेकले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गिरण नदीपात्रातून अवैध बेसमुार वाळू उपसा सुरू आहे. वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाच्या गस्ती पथक नियुक्त के आहे. गस्ती पथकातील मंडलाधिकाऱ्यांनी वाळू डंपर ताब्यात घेतला.

तो जप्त करून नेताना डंपरच्या केबिनमध्ये बसलेल्या मंडलाधिकाऱ्याला चक्क केबीनमधून फेकून चालकाने डंपर पळवून नेला. ही घटना शनिवारी (ता. २४) रात्री घडली. (sand mafia crime increase mandal officer thrown out of dumper Three bras poured sand on road and spread driver with a dumper jalgaon news)

प्रांताधिकारी महेश सुरळकर यांच्या पथकातील मंडलाधिकारी अजिंक्य उद्धव आंधळे (वय ३५), चालक सुरेश बापू महाजन शासकीय वाहनाने (एमएच १९, सीवाय ९९९१) गस्तीवर असताना, रात्री जुने खेडी रोडवर काऊ कोल्हे शाळेजवळ वाळूने भरलेला सुसाट डंपर (एमएच १९, सीवाय ९९९१) ला तपासणीसाठी थांबविण्यात आले.

मंडलाधिकारी आंधळे यांनी चालकाला त्याचे नावव गाव विाचरले असता, त्याने मालक आकाश इच्छाराम पाटील याचा डंपर असल्याचे सांगितले. वाळू वाहतूक परवान्याची मागणी केली असता, चालकाकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

मंडलाधिकारी आंधळे यांनी वाळू डंपरच्या केबिनमध्ये बसून डंपर जिल्‍हाधिकारी कार्यालयात घेऊन चालण्याबाबात सांगितल्यावर डंपर मागे घेण्याचा बहाणा करत चालकाने केबीनमध्ये बसलेले मंडलाधिकारी आंधळे यांना धक्का मारून बाहेर फेकले.

डंपर मागे घेऊन वाळू भर रस्त्यावर ओतून चालकाने धूम ठोकली. याबाबत मंडलाधिकारी आंधळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात डंपरचालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratik Yadav: शरीराच्या ६ भागांवर जखमांच्या खुणा अन्... प्रतीक यादव यांचा मृत्यू कसा झाला? शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं खरं कारण समोर

Latest Marathi News Live Update : अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागपुरात पुन्हा पावसाची हजेरी, उकाड्यातून नागरिकांना दिलासा

Jalgaon News : नदी ओलांडताना बळीराजासह सर्जा-राजा बुडाले; गिरणा पात्रातील बेसुमार उपशामुळे निष्पापांचा बळी

Lake Fish Deaths : देवगाव तलावातील मासेमृत्यूने खळबळ; दुर्गंधी, दूषित पाण्याची शंका असून प्रशासनावर तपासणी टाळल्याचा आरोप

NEET Exam Scam: नीट पेपरफुटीने २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; वर्षभरात पाच पेपरफुटी, मुख्यमंत्री फडणवीसांनी आत्मचिंतन करावे – मनोज प्रधान

SCROLL FOR NEXT