illegal sand transportation esakal
जळगाव

Sand Smuggling News : पोलिसांच्या आशीर्वादातून सोडले वाळूचे ट्रॅक्टर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षकांना शुक्रवारी (ता. २७) रात्री मिळालेल्या माहितीवरून तालुका पोलिसांना कारवाईच्या सूचना मिळाल्या होत्या. पथकाने तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून निळे रंगाचे ट्रॅक्टर ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.

मात्र, नंतर ते ट्रॅक्टर सोडून देण्यात आले. त्याजागी तशाच रंगाचे दुसरे ट्रॅक्टर आणून उभे केल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे करण्यात येऊन सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे.

पोलिस आणि वाळूमाफिया यांच्यातील सौख्य जगजाहीर आहे. इतकेच काय, तर सरकारचा पगार घेऊन काही पोलिसदादांनी स्वतःच वाळूचा व्यवसाय सुरू केला असून, काहींनी ट्रॅक्टर-डंपर या व्यवसायात उतरविले आहेत.शुक्रवारी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गिरणा नदीपात्रातून वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून तालुका पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणून जमा केले.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

मात्र, ते ट्रॅक्टर काही वेळाने सोडून देण्यात आल्याची तक्रार जिल्‍हा पोलिस अधीक्षकांसह अपर अधीक्षकांकडे करण्यात आली. तत्काळ याप्रकरणी चक्रे फिरवून ट्रॅक्टर आणून पुन्हा पोलिस ठाण्यात लावण्यात आले. मात्र, सोडून दिलेले ट्रॅक्टर वेगळेच होते आणि नंतर पोलिसांनी आणून लावलेले ट्रॅक्टर भलतेच असल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत दीपक गुप्ता यांनी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह वाळूचे ट्रॅक्टर सोडून देणारे गुन्हे शाखेचे कर्मचारी अविनाश देवरे, दीपक शिंदे आणि रवी यांच्या चौकशीची मागणी करून पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. या तक्रारीवर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे.

ट्रॅक्टरची अदलाबदल

तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी रात्री लावलेले ट्रॅक्टर गुन्हे शाखेचे कर्मचारी आणि तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षकांच्या संगनमताने सोडून दिले होते. मात्र, त्याची तक्रार होताच तसेच दिसणारे दुसरे ट्रॅक्टर आणून लावल्याने पुन्हा एकदा पोलिसदलाची बदनामी या प्रकरणातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT