Sand trader house fired for extortion Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वाळू व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार; 10 दिवसांतील दुसरी घटना

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील कानळदा रोडवरील केसीई पार्क भागात वाळू व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी (ता. २७) रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली.

सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती असून, वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Sand trader house fired for extortion Jalgaon Crime News)

हल्लेखोरांनी खंडणीसाठी हा गोळीबार केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले असून, शहरात अवघ्या दहा दिवसांतील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगरातील विस्तारित परिसर असलेल्या उस्मानिया पार्क येथे दहा दिवसांपूर्वी म्हणजे १७ जुलैला गोळीबार झाल्याची घटना घडली होती. भरदिवसा झालेल्या या गोळीबाराची चर्चा शांत होत नाही, तोवर शिवाजीनगरातील लाकूडपेठ-कानळदा रोडवरील केसीई पार्क भागात हल्लेखोरांनी गुरुवारी (ता. २७) रात्री साडेआठ ते पावणेनऊच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली.

यात अद्याप तरी कुणी जखमी झाल्याची माहिती नसून, गोळीबाराची घटना कळताच अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक संदीप गावित, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन पाटील, निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह गुन्हेशोध पथकासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पैसे देण्यास नकार दिल्याने हल्ला

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार लखन ऊर्फ गोलू मराठे, लक्ष्मण शिंदे, नरेंद्र शिंदे, पवन गावडे, केऊर पंधारे, बंटी बादल यांनी शुभम अशोक माने या वाळू व्यावसायिकाच्या घरावर गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हल्ला चढविला.

या हल्ल्यात दोन पिस्तूलमधून तीन राउंड फायर झाले. माने यांच्या घरातील खिडकीच्या काचेतून गोळी आरपार गेली. दरम्यान, संशयितांकडून सहा महिन्यांपासून (खंडणी) पैशांची मागणी सुरू होती. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयितानी गोळीबार केला.

चिंग्या गँगचा समावेश

चेतन सुरेश आळंदे ऊर्फ चिंग्या याच्या टोळीतील हे संशयित असून, आठ वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा जामीन झाला; तर चिंग्या हा आसोदा गोळीबार प्रकरणात कारागृहात आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT