sanjay pawar  esakal
जळगाव

Jalgaon News : अजित पवारांना डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा : संजय पवार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष उभा करण्यासाठी तालुक्याचे नेते बंगालसिंह चितोडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जाती-धर्माच्या लोकांचा समावेश करून त्यांना सोबत घेऊन पक्षाची बांधणी करावी, अशा सूचना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केल्या.

पक्ष श्रेष्ठींनी आदेश केला तसे काम करावे लागेल.( Sanjay Pawar statement Start work keeping Ajit Pawar in mind jalgaon news )

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना समोर ठेवून स्थान दिले. तालुक्याचे नेते बंगालसिंह चितोडिया यांच्या भक्ती पार्क दत्तकुटी बंगल्यावर झालेल्या बैठकीत पवार मार्गदर्शन करत होते.

यावेळी कल्पना पाटील, अभिषेक पाटील, मीनल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नरेंद्र जंजाळ, किरण पाटील, विकास पाटील, पंडित नाईक ,अभय राठोड, अरविंद तायडे, प्रभू झाल्टे, मधुकर शिंदे, विलास सांगळे, हिरामण चव्हाण, रमेश शिंदे, पंडित नाईक, नवल नाईक, स. आरिफ, सय्यद मुसा, युवा तालुका उपाध्यक्ष वीरेंद्र चितोडिया, जमेरीसिंग चितोडिया यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

आयुष्यमान कार्डसाठी कॅम्प : चितोडिया

आयुष्यमान भारत कार्डसाठी गावोगावी कॅम्प उभारणार असल्याचा संकल्प तालुक्याचे नेते बंगालीसिंह चितोडिया यांनी केला. तालुक्यातील दलित, भटक्या विमुक्त जाती जमाती, तसेच गोरगरीब दीनदुबळ्या लोकांना हे कार्ड मोफत देण्याचे सुविधा उपलब्ध करून देऊ, अशी घोषणाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा युवा अध्यक्षपदी अरविंद चितोडिया यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली तर जामनेर तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून नरेंद्र जंजाळ, कार्याध्यक्ष किरण पाटील, तालुका उपाध्यक्ष अभय राठोड, तालुका समन्वयक विकास पाटील, शहराध्यक्ष प्रभू झाल्टे, अशा नियुक्ती जवळपास निश्चित करण्यात आल्या आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विकास पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT