Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : जुना खेडी रोडवरील तीन घरांवर संक्रात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील जुना खेडी रोड परिसरतील तीन बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना रविवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला.

जुना खेडी रोड परिसरातील संदीप रामलाल चौधरी पत्नी व मुलांना घेण्यासाठी धरणगावला सासुरवाडीला गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. (Sankranti on three houses on Juna Khedi Road jalgaon Cash and jewellery theft after three house burglaries in a row Jalgaon News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड चोरट्यांनी लंपास केली, तर चांदीचे दागिने त्याचठिकाणी ठेवून चोरट्यांनी पलायन केले. नंतर चोरट्यांनी त्यांच्या घराशेजारील पंकज सपकाळे व योगेश जाधव यांच्या घरात हातसफाई केली.

त्या ठिकाणाहून चोरट्यांनी रोकड लंपास केली. एकाच वेळी तीन घरांत चोरट्यांनी डल्ला मारल्याने पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. त्यानंतर श्वान व फॉरेन्सीकच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman in Cave : परदेशी लोकांना भारत स्वर्गासारखा, 'त्या' रशियन महिलेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने असे का म्हटले?

Miraj Dangal : मिरजेत दोन गटांत राडा, जातीविषयी द्वेष निर्माण करणारे वक्तव्य; नेमकं रात्री काय घडलं?, पोलिसांची भूमिका काय

Laxmi Niwas : अखेर तो क्षण आलाच ! जान्हवी शिकवणार जयंतला धडा; लेखिकेचंही कौतुक करत प्रेक्षक म्हणाले "ज्जे बात !"

Latest Marathi News Live Update : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा रुग्णालयात दाखल; आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Pune Weather Update : पुण्यात तापमानाचा पारा चढला, पुढील काही दिवसांत उकाडा वाढणार

SCROLL FOR NEXT