Court canceled punishment esakal
जळगाव

Jalgaon News : खंडणीप्रकरणी सरपंचाची शिक्षा अपिलात रद्द

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : वाकडी (ता. चाळीसगाव) येथील विद्यमान सरपंच प्रकाश पाटील यांनी व इतर दोघांनी सावदा (ता. रावेर) येथील हाजी ईमदाद अली अख्तर हुसेन या पेट्रोलपंपावर ‘तुम्ही पेट्रोल, डिझेलमध्ये भेसळ करतात, आम्ही बॉम्बे व्हिजीलन्स स्क्वॉडचे अधिकारी आहोत’ असे सांगून वेळोवेळी खंडणी वसूल केली होती.

त्यानंतर फिर्यादी शब्बीर हुसेन अख्तर हुसेन यांनी सावदा पोलिसांच्या सहकार्याने तिघांना सापळा लावून खंडणी वसूल करताना रंगेहात पकडले होते. त्यानुसार, तिघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. (Sarpanch Punishment in extortion case quashed on appeal Jalgaon News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

त्यानंतर रावेर न्यायालयाने सरपंच प्रकाश पाटील यांना दोन वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाच्या विरोधात प्रकाश पाटील यांनी भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी अपील दाखल केले होते.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी आरोपी प्रकाश पाटील यांची रावेर कोर्टाने दिलेली दोन वर्षाच्या सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा रद्द करून त्यांना या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले.

या खटल्यात आरोपी प्रकाश पाटील यांच्यातर्फे जळगाव येथील ॲड. निरंजन ढाके यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. भोंबे व फिर्यादीतर्फे ॲड. जगदीश कापडे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT