accident news esakal
जळगाव

Jalgaon Accident News : उसाच्या ट्रॅक्टरखाली आल्याने शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू

रधाव भुसावळकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरखाली आल्याने बारा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : भरधाव भुसावळकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरखाली आल्याने बारा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना यावल- भुसावळ मार्गावरील निमगाव येथील नयनसिंग पाटील यांच्या शेताजवळ बुधवारी (ता. २०) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

याबाबत ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(school boy died on spot after coming under sugarcane tractor jalgaon accident news)

यावलहून भुसावळ मार्गे मुक्ताईनगर येथे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९, डीएफ २५३५) जात असताना निमगावजवळ नयनसिंग खुबसिंग पाटील यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीच्या चाकाखाली आनंद रघुनाथ सोनवणे (वय १२, रा. निमगाव (ता. यावल) आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत मृत आनंदचे काका किरण फफिरा कोळी यांनी यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने ट्रॅक्टरचालक सोनू छोटू पारधे (रा. डोडीकर, ता. चाळीसगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश सानप तपास करीत आहेत. दरम्यान, मृत मुलाच्या मृतदेहाचे विच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रशांत जावळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT