Jalgaon: School children running along the Mumbai railway track, climbing on the track and looting kites and manja esakal
जळगाव

Jalgaon News : पतंगाच्या दोरी लुटताना जीवनाची दोरी तुटली तर?

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मकरसंक्रांत तोंडावर आल्याने सध्या पतंगांचा सीझन सुरू आहे. पतंग उडविणे, त्याचा उत्सव साजरा करणे, त्यातून आनंद घेणे हे स्वाभाविकच, पण हीच पतंग आणि तिची दोरी (मांजा) लुटण्यासाठी शाळकरी मुले आपला जीव धोक्यात घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आशाबाबानगर परिसरात रेल्वेट्रॅकला लागून पतंगांचा खेळ सुरू असताना, मांजा लुटण्यासाठी ही मुले ट्रॅकच्या दिशेने पळत जाऊन तिथून उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीवरून मांजा लुटत असल्याची जीवघेणीदृश्‍ये दिसून येत आहेत. (School children running on Mumbai railway tracks stealing kites and manja by climbing on tracks not serious about health Jalgaon News)

या परिसरातीलच नव्हे, तर अन्य भागांतूनही मुले याठिकाणी जमून असे प्रकार करीत आहेत. पालकांनी अशा आपल्या पाल्यांच्या कृतीकडे लक्ष देण्याची गरज असून, पोलिसांनीही या परिसरात लक्ष ठेवून मुलांना हटकले पाहिजे, अशी मागणी होतेय.

पतंगांचा सीझन

येत्या रविवारी मकरसंक्रांतीचा दिवस आहे. ‘तीळगूळ घ्या... गोड बोला...’, असा नात्यांत गोडवा देणारा संदेश देत मनसोक्त पतंग उडवून त्याचाही आनंद घेण्याचा हा उत्सव. संक्रांतीच्या दिवसाच्या १५ दिवस आधीपासूनच पतंगांचा उत्सव सुरू होतो. बच्चे कंपनीसह तरुणाईही त्याचा आनंद लुटते. मात्र, या उत्सवात नायलॉन मांजा वापरून प्राणी, पक्ष्यांसह मानवाच्याही जीवितास धोका पोचतो.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

पतंग लुटण्याच्या नादात

जीव घालतांय धोक्यात

आनंद देणारी ही पतंग नियमाने, कुठलीही अविचारी कृती केली नाही, तर आनंद देते. मात्र, अविचारी पद्धतीने हा खेळ खेळला, की जिवाशी येतो. सध्या बच्चे कंपनीत पतंग उडविण्याची स्पर्धा लागलीय. शिवकॉलनीच्या पश्‍चिमेस आशाबाबानगर रेल्वे ट्रॅकच्या त्या बाजूला हरिविठ्ठलनगर परिसरात मोकळ्या जागेत मुले मोठ्या प्रमाणात पतंग उडविताना दिसतात. पतंग उडविताना काटाकाटीचाही खेळ रंगतो. कटलेली पतंग, मांजा लुटण्यासाठी ही मुले सुसाट पळत सुटतात. मात्र, मध्ये असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूनेही मुले पळतात आणि उचंच उंच गेलेली पतंग, मांजा लुटण्यासाठी प्रसंगी ट्रॅकवरही जातात आणि जीव धोक्यात घालतात. शिवाय, रेल्वेसाठीची उच्चदाब वीज वाहिनीवरही अनेकदा मांजा अडकतो, तो काढण्याचाही गंभीर प्रकार ही मुले करीत असल्याचे आढळून येत आहे.

पालकांचे पाल्यांकडे दुर्लक्ष

आनंद देणाऱ्या या खेळात पतंगाची दोरी लुटताना जीवनाची दोरी तुटू शकते, याचे भानही या मुलांना नाही. विशेष म्हणजे या परिसरातील पालकांचेही त्यांच्या पाल्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे हा गंभीर प्रकार थांबविण्यासाठी पालकांनी लक्ष घातले पाहिजे. पतंग, मांजासाठी अनेकांनी प्राण गमावल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो किंवा पाहतो. त्यातून धडा घेऊन हे प्रकार घडू नये, म्हणून सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Retirement Plan : आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता नाही! या 5 योजनांत गुंतवणूक करा; तिजोरी भरलेलीच राहील, दरमहा मिळेल मोठी पेन्शन

Tilak Varma Injury: तिलक वर्माला पोटातील तीव्र वेदनेमुळे अचानक करावी लागली सर्जरी! त्याला झालेला अजार नेमका आहे तरी काय?

Mangal Gochar 2026: 18 वर्षांनंतर कुंभ राशीत मंगल गोचर! अग्नि-वायु एकत्र येऊन तयार होतोय अंगारक योग, वृषभसह 'या' 5 राशींच आयुष्य होईल अगदी कठीण!

Latest Maharashtra News Updates Live: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार या सिंहाचा आणि अजित पवार या वाघांचा वारसा सांगणारा-आमदार अमोल मिटकरी

Sunset Destinations: 'Sunset Lovers' साठी भारतातील हे 4 हॉटस्पॉट्स, एकदा नक्की भेट द्या!

SCROLL FOR NEXT