Seeds esakal
जळगाव

जळगाव : बियाणे मार्केटमध्ये 120 कोटींची उलाढाल

देवीदास वाणी

जळगाव : जून महिना म्हटला की शेतात पेरण्यांसाठी बियाणांची मोठी मागणी असते. गल्ली ते दिल्लीपर्यंत बियाणे मार्केट (Seed Market) यावेळी तेजीत असते. यंदाही ते तेजीतच होते. सुमारे १२० ते १२५ कोटींची उलाढाल बियाणे विक्रीतून (Seed Selling) मे-जून महिन्यात झाली आहे. यंदा पाऊस (Rain) चांगला असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते. यामुळे शेतकऱ्यांनी जून महिना उजाडताच हजारो रुपयांचे बी. टी. कापूससह इतर बियाणे खरेदी करून ठेवले आहे. (Seed market turnover of Rs 120 crore Jalgaon News)

कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होवू नये, म्हणून शासनानेच जून महिन्यातच बी. टी. बियाणे विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यात २५ मेस सर्व मोठ्या विक्रेत्यांकडे बियाणे आले होते. मात्र शासनाच्या निर्णयामुळे ते विक्री करू शकत नव्हते. हवामान विभागाने २९ मे पासूनच दमदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी वेगात केली. एक जूनला सर्वत्र बियाणे खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र होते.

नंतर मात्र पाऊस येईल, या आशेवर शेतकरी बियाणे खरेदी करीत राहिला. मात्र पावसाने झुलवत ठेवले. १७ जूनला बऱ्यापैकी पाऊस झाला. नंतर तुरळक पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हवामान विभागाचा अंदाज हा ‘अंदाज’च ठरत आहे.

उधारीने बियाणे खरेदी

शेतकऱ्यांनी उधारी, उसनवारी करून, कर्जे घेऊन बियाणे खरेदी केली आहे. बियाणे पेरून लवकर उत्पादन येईल व उधारी, उसनवारी फेडता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र पाऊस लांबतच चालला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात खतपुरवठा सुरळीत सुरु आहे. युरियाचा ६० हजार ९१० मेट्रीक टन साठा विक्रीसाठी उपलब्ध आहे. डीएपी खताचा ६ हजार ४९३ मेट्रीक टन एमओपी खताचा ८ हजार ५४४ मेट्रीक टन एनपीके संयुक्त खतांचा २८ हजार ६९० मेट्रीक टन व एसएसपी खताचा ४७ हजार ११९ साठा विक्रीसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली.

"जिल्ह्यात २७ लाख ५० हजार बी. टी. पाकिटांची मागणी होती. ती सर्व आली आहेत. आतापर्यंत १६ ते १७ लाख बी. टी. पाकिटे विक्रीस गेले आहेत. शेतकऱ्यांचा यंदा कपाशीवरच भर अधिक आहे." - संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Year Ender 2025 : IPO गुंतवणूकदारांची लॉटरी! या वर्षातील टॉप 7 IPO; काहींनी पहिल्याच दिवशी दिला 60% रिटर्न

Latest Marathi News Live Update : मुंबईत थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

Shahada News : खळबळजनक! शेतकऱ्यांच्या हक्काच्या युरियावर डल्ला; शहाद्यात बनावट 'डीईएफ' कारखान्याचा पर्दाफाश

Wani News : सप्तशृंगगडाचा घाटरस्ता की मृत्यूचा सापळा? वर्षभरापासून काम रखडल्याने भाविकांचा जीव टांगणीला!

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन खून प्रकरणाचा उलगडा; सोलापुरातून २ आरोपी अटकेत; वैयक्तिक वादातून हत्या झाल्याचे निष्पन्न!

SCROLL FOR NEXT