valentine-day--special esakal
जळगाव

Valentines Day : अरे देवा...लग्नाला आले, लग्न न लावताच ठोकली धूम...

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. समाजात आपल्या मुलीने-मुलाने दुसऱ्या समाजाची मुलगा/मुलगी केली. यामुळे समाजात बदनामी होईल.

यामुळे दोघांच्या घरून विरोध असतो. या विरोधाला घाबरूनच प्रेमीयुगुल लपून विवाहबद्ध (Married) होतात. (seeing videographer photographer in wedding 7 to 8 couples stormed out of office without getting married jalgaon news)

विवाह नोंदणी कार्यालयात विवाह केला तर कायद्याचा आधार असतो. यामुळे आज २० जणांनी लग्न बंधनात अडकण्याचे ठरविले होते. मात्र, सकाळीच शहरातील अनेक छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर प्रेमीयुगुलांचा लग्नबंधनाचा क्षण टिपण्यासाठी जमले होते. हे समजताच तब्बल सात ते आठ जोडप्यांनी विवाह लावून न घेताच, कार्यालयाच्या बाहेरून धूम ठोकली आहे.

आजचा दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठी खास मानला जातो. पण हा दिवस आयुष्यभर लक्षात राहावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी लग्न केल्यास तो दिवस आयुष्यभर स्मरणात राहील यासाठी काही प्रेमीयुगुलांनी लग्न करण्याचे ठरविले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालयातून ७० ते ८० विवाहेच्छुकांना लग्नाबाबत नोटिसा देऊन लग्न लावण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यातील पाच जणांनीच ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या दिवसाचा मुहूर्त साधत स्वत:ला विवाह बंधनात अडकवून घेतले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

‘व्हॅलेंटाइन डे’ला अनेक प्रेमीयुगुलांनी शुभेच्छा संदेश देणारे ग्रीटिंग कार्ड दिले. काही प्रिय व्यक्तींवर भेटवस्तूंचा वर्षाव केला. हार्ट शेप, चौकोनी आकार, फोल्डिंग ग्रीटिंग व त्यावर प्रेमाविषयीचा छानसा संदेश, कुठे गुलाबाची प्रिंट असलेले ग्रीटिंग, तर हार्टमध्ये नाव टाकून मिळणारे ग्रीटिंग अशा अनेक प्रकारच्या ग्रीटिंगला आज मोठ्या प्रमाणात मागणी होती.

"आज दहा ते पंधरा विवाह होणार होते. मात्र सायंकाळपर्यंत पाच जोडपी विवाहासाठी आली. त्यांचे विवाह लावण्यात आले. इतर अनेक जोडपी आली होती, मात्र ती बाहेरूनच विवाह न लावता गेली. जानेवारी ते आजपर्यंत एकूण ६८ विवाह नोंदणी या कार्यालयात झालेली आहे."

-संजय ठाकरे, विवाह अधिकारी, दुय्यम निबंधक-१, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT