Encroachment on Bhangar Bazar Road near Ajantha Chauphuli was removed on Wednesday.  esakal
जळगाव

Jalgaon News : महापालिकेतर्फे भंगार बाजारातील वाहने जप्त; अतिक्रमण विभागाची धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिकेतर्फे शहरातील अतिक्रमण हटविण्याची धडक मोहिम बुधवारी (ता. ३१) तिसऱ्या दिवशीही सुरूच होती. अजिंठा चौफुलीजवळील भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविण्यात आले. (seized vehicles from scrap market by municipal corporation jalgaon news)

त्या ठिकाणी चार चाकी भंगार वाहने जप्त करण्यात आली आहेत. महापालिकेतर्फे ही कारवाई प्रथमच करण्यात आली.

शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे महापालिकेवर जोरदार टिका होत होती. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम गेल्या तीन दिवसांपासून हाती घेतली आहे.

बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे अजिंठा चौकातील भंगार बाजार हटविण्याची कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणी रस्त्यावर असलेले साहित्य जप्त करण्यात आले. तर, काही भंगार चारचाकी वाहने टो लावून महापालिकेत आणून जप्त करण्यात आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

फुल मार्केटमध्ये मोहिम सुरूच

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा फुले मार्केटमध्येही बुधवारी तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणाविरूद्ध मोहिम सुरूच होती. त्यामुळे मार्केटमध्ये सायंकाळपर्यंत रस्त्यावर दुकाने लागलीच नाहीत.

परिणामी, गेल्या तीन दिवसांपासून मार्केट मोकळा श्‍वास घेत असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त गणेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधिक्षक उमेश नस्टेही मोहिम राबवित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : राज्यातले सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी सक्षम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT