chhatrapati shivaji maharaj Shivrajyabhishek sohala sakal
जळगाव

Jalgaon News : ‘शिवाजी महाराजांची लष्कर नीती’वर चर्चासत्र; 16, 17 फेब्रुवारीस आयोजन

१६ व १७ फेब्रुवारी २०२४ ला ‘छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी नीती आणि प्रशासकीय धोरणांची आधुनिक युगातील प्रासंगिकता’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागातर्फे १६ व १७ फेब्रुवारी २०२४ ला ‘छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी नीती आणि प्रशासकीय धोरणांची आधुनिक युगातील प्रासंगिकता’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे.

देशातील मान्यवर तज्ज्ञ, अभ्यासक यामध्ये सहभागी होणार आहेत.(Seminar on Shivaji Maharaj Army Policy on 16 and 17 february jalgaon news)

फेब्रुवारीत होणाऱ्या या चर्चासत्रासाठी आयसीएसएसआर (नवी दिल्ली) या संस्थेमार्फत अर्थसाहाय्य प्राप्त झाले आहे. १६ फेब्रुवारीस भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे बीजभाषण होणार आहे.

असे तज्ज्ञ असे विषय

‘छत्रपती शिवाजी महाराज- राष्ट्र बांधणी करणारे सर्वोत्कृष्ट नेतृत्व’ या विषयावर हॉ. सहस्रबुद्धे मांडणी करतील. दोन दिवसाच्या या राष्ट्रीय चर्चासत्रात निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी (छत्रपती शिवाजी महाराज- भारतीय लष्करी शक्तीचे पुनरुज्जीवन आणि आधुनिक काळाशी त्यांची समयोचितता), पुणे येथील डॉ. श्रीकांत परांजपे (छत्रपती शिवाजी महाराज- सर्वोत्कृष्ट सामरिक विचारवंत)

महाराष्ट्र राज्याचे माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर (छत्रपती शिवाजी महाराज-गुप्तहेर खाते आणि सध्याच्या हेर खात्यासाठी धडे), पुणे येथील भारत सरकारच्या ऐतिहासिक संशोधन मंडळाचे सदस्य विक्रमसिंग बाजी मोहिते (छत्रपती शिवाजी महाराज- दक्षिण दिग्विजय आणि त्यांचे सामरिक महत्त्व), नाशिक येथील हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रकाश पाठक (छत्रपती शिवाजी महाराज- गनिमी कावा युद्ध पद्धती आणि आधुनिक युद्ध पद्धतीत त्यांचे महत्त्व)

पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रायगड मेमोरिअल मंडळाचे संचालक रघुजी राजे आंग्रे (छत्रपती शिवाजी महाराज- भारतीय नौदलाचे पितामह, शिवकाळातील नौदलाची नीती आणि त्यांचे शत्रुंवर झालेले परिणाम), पुणे येथील महाराष्ट्र शासनाच्या किल्ले रायगड प्राधिकरणाचे सल्लागार सुधीर थोरात (छत्रपती शिवाजी महाराज- राज्यातील प्रशासन आणि सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठीचे धडे)

डेक्कन कॉलेज पुणे येथील पुरातत्त्व विभागाचे डॉ. सचिन जोशी (शिवकाळातील किल्ले- किल्ल्यांचे भूसामरिक महत्त्व), किल्ले रायगड संवर्धन आर्किटेक्ट रायगड प्राधिकरणाचे वरुण भामरे ( शिवकाळातील किल्ले- किल्ल्यांचे लष्करी स्थापत्यशास्त्र आणि त्यांचे जतन) हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

यशस्वितेसाठी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती गठित करण्यात आली असून व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे हे कार्याध्यक्ष, प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ. रामचंद्र भावसार हे समन्वयक आणि संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे डॉ. तुषार रायसिंग हे सचिव म्हणून काम पाहत आहेत. चर्चासत्रात छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन करणारे संशोधक, अभ्यासक तसेच प्राध्यापक व विद्यार्थी यांना शोधनिबंध सादर करण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT