accepting bribe crime esakal
जळगाव

Jalgaon bribe Crime : वीज कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात

शेतातील ट्यूबवेल मोटार कनेक्शन देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना धानोरा (ता. चोपडा) येथील वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल शंकर राठोड (वय २८) यास जळगाव एसीबीने शुक्रवारी (ता. २२) दुपारी लाच स्वीकारताच अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon bribe Crime : शेतातील ट्यूबवेल मोटार कनेक्शन देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना धानोरा (ता. चोपडा) येथील वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल शंकर राठोड (वय २८) यास जळगाव एसीबीने शुक्रवारी (ता. २२) दुपारी लाच स्वीकारताच अटक केली.

या कारवाईने वीज कंपनीतील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Senior technician arrested by company in ACB jalgaon bribe crime news)

५० वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नीचे नावाने देवगाव (ता. चोपडा) शिवारात गट नंबर ३३० मध्ये शेत आहे. या शेतात थ्रीफेजचे ट्यूबवेल मोटारसाठी तक्रारदार यांनी वीजजोडणी घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता.

तक्रारदार अनिल राठोड यांना भेटल्यानंतर त्यांनी चार हजारांची लाच मागितली व तीन हजारांत तडजोड करण्यात आली. शुक्रवारी दुपारी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. अडावद पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, तसेच एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT