Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : मनपा प्रशासक नियुक्तीचा शासन देणार स्वतंत्र आदेश; रविवारी संपणार कार्यकाळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांची पाच वर्षाची मुदत येत्या रविवारी (ता. १७) संपत आहे. त्यामुळे शासनातर्फे शुक्रवारी (ता. १५) प्रशासक नियुक्तीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांची पाच वर्षाची मुदत संपण्यापूर्वीच निवडणूक होणे अपेक्षित असते. (separate order will be issued by government for appointment of municipal administration jalgaon news)

परंतु मुंबईसह सर्वच महापालिका, नगरपालिका, तसेच जिल्हा परिषदांची मुदत संपली असतानाही अद्याप निवडणूका जाहिर झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वच ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.

जळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त नगरसेवकांची व पदाधिकाऱ्यांची मुदत रविवारी पूर्ण होत असून, येथेही प्रशासकांची नियुक्ती होणार आहे. शासनातर्फे प्रशासक नियुक्तीचे स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शनिवारी (ता. १६) सुटी असल्यामुळे शासनाच्या नगरविकास विभागातर्फे शुक्रवारी सायंकाळपर्यंत आदेश निघण्याची शक्यता आहे.

प्रशासकपदी विद्यमान आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचीच नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच पार्श्‍वभूमीवर त्या गुरूवारी (ता. १४) मुंबईत एका बैठकिसाठी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेवर प्रशासक नियुक्ती झाल्यास शहराच्या बाबतीत खर्चासह सर्व निर्णय घेण्याचे अधिकारही त्यांना असतील. महापालिकेच्या निवडणूकीत प्रभाग रचनेसह निवडणूक प्रक्रियाही त्यांच्याच अधिकाराखाली होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT