Setting by police for settlement of Shri Shiv Mahapuran Katha in Jalgaon news 
जळगाव

Shiv Maha Puran Katha: जळगावमधील श्री शिवमहापुराण कथा बंदोबस्तासाठी पोलिसांकडून ‘सेटिंग'

सकाळ वृत्तसेवा

Shiv Maha Puran Katha: कानळदा रेाडवरील वडनगरी फाटा भागातील बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात सुरू झालेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेसाठी हजारांहून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एरव्ही बंदोबस्ताच्या नावाने नाक तोंड मुरडणारे पोलिसांनी कथेसाठी आपल्याला बंदोबस्ताच्या ठिकाणी तैनात करावे, यासाठी वाद घालत असल्याचे दिसून आले. (Setting by police for settlement of Shri Shiv Mahapuran Katha in Jalgaon news)

जळगावसह विविध जिल्ह्यातून जवळपास एक लाखांवर भाविक दर्शनासाठी आले आहेत. त्यासाठी जळगाव शहराच्या बाहेरून वाहतूक वळवण्यात आली असून वेगवेगळ्या मार्गांनी वाहने कार्यक्रमस्थळावरील वाहनतळापर्यंत पोचवण्यात येत आहेत. वाहतूक व्यवस्था, बंदोबस्त, कार्यक्रमस्थळावर अप्रिय घटना घडू नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा लावण्यात आलेला आहे.

मुख्य कार्यक्रमस्थळाजवळ बंदोबस्त मिळावा, यासाठी काही पोलिसांनी ‘फिल्डींग' लावली होती. काहींना कुटुंबीयांना दर्शनासाठी पुढच्या रांगेत पोचवायचे होते.

काहींना स्वतः दर्शनासह प्रवचन ऐकायचे असल्याने जो-तो आपल्या ‘सेटिंग' लावण्यात मग्न होता. काहींना बंदोबस्त मिळाला, पण बहुतांश जणांचा हिरमोड झाला.

साहेब ! मला बंदोबस्त

गुन्हे, वाहतूक, आर्थिक गुन्हे, विशेष शाखा, मुख्यालयासह प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक ते दोन कर्मचारी बंदोबस्तासाठी मागवण्यात आले आहेत. बंदोबस्तात अडीचशे महिला कर्मचारी असून पंडित प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन ऐकण्यासाठी आपल्या शाखेतील महिलांना बंदोबस्त मिळावा म्हणून साहेबांना गळ घालण्यात आली.

काही ठिकाणी पहिल्या दिवसाचा बंदोबस्त झाल्यावर दुसऱ्या दिवशी आरामाची संधी असते. मात्र सुटी नको, आम्हांला बंदोबस्त हवाय, असे सांगितले जात होते. बंदोबस्तासाठी हजेरी मास्तर यांच्याकडे वाद रंगले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चित्रपट संस्कृतीचा मानदंड! २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; कधी आणि कुठे होणार सोहळा?

Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय

Swiggy food trends 2025 : भारतीयांनी २०२५ मध्ये ‘स्विगी’वर सर्वाधिक ऑर्डर केला ‘हा’ पदार्थ; तुम्ही खाल्लाय का?

Solapur News : विद्या मंदिर चे स्नेहसंमेलन म्हणजे ग्रामीण मुलांसाठीची पर्वणीच- तहसीलदार मदन जाधव.

Latest Marathi News Live Update : सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक!

SCROLL FOR NEXT