money
money esakal
जळगाव

Jalgaon News : सेतू चालकांकडून विद्यार्थी, पालकांची लूट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी सेतू केंद्र चालकांकडून विद्यार्थी व पालकांची लूट केली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला असून, विद्यार्थ्यांनी ठरलेल्या दरप्रमाणेच पैसे द्यावेत, अन्यथा तहसील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी केले आहे. (setu office taking more money from students parents jalgaon news)

दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेयर, उत्पन्न दाखला, सेंट्रल कास्ट, डोमीसाईल सर्टिफिकेट आदी प्रकारचे दाखले काढण्यासाठी गर्दी करत आहेत.

विविध ठिकाणी प्रवेश, नोकरी अर्जासाठी, मुलाखतीसाठी लवकर दाखले मिळण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची तळमळ सुरू असल्याने त्याचा गैरफायदा घेत सेतू केंद्र चालक किमान ३६ रुपये फी असताना विद्यार्थ्यांकडून दोनशे ते तीनशे रुपये घेत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोन पालकांनी तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. सेतू केंद्रचालकांनी त्यांच्या केंद्रावर प्रत्येक दाखल्यासाठी लागणारी फीचे दरपत्रक बाहेर लावणे आवश्यक आहे. तसेच तहसील कार्यालयात देखील माहितीसाठी प्रत्येक दाखल्याचे दर जाहीर करण्यात येतील.

मात्र विद्यार्थ्यांनी कोणत्याही सेतू चालकाला जादा पैसे देऊ नयेत, सेतू केंद्रचालकाने जादा पैसे मागितल्यास अथवा दाखल्याची कागदपत्रे न स्वीकारल्यास तहसील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT