Jalgaon: A picture of the arrangement being set up on the occasion of Godri Kumbha esakal
जळगाव

Jalgaon News : गोद्री कुंभासाठी साकारताहेत सात नगरे!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गोद्री (ता. जामनेर) येथे २६ ते ३० जानेवारीदरम्यान पाचशे एकर क्षेत्रात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ होत आहे.

त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. देशभरातील संत-महंत, चार राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्रिगण या कुंभाला उपस्थित राहणार आहेत. रोज लाखभर भाविक कुंभात येतील, असा अंदाज असून, त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी सात नगरांची निर्मिती करण्यात आली आहे.

त्यामध्ये पन्नास हजार भाविकांची व्यवस्था असेल. दिवसभरात कुंभमेळ्यात येणाऱ्या दीड लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. भोजन तयार करण्यासाठी सात मोठी स्वयंपाकघरे उभारण्यात आली आहेत. (Seven cities planned for Godri Kumbha Arrangements to be made in five hundred acre area Accommodation arrangements for fifty devotees thousand Jalgaon News)

चोवीस तास अन्नछत्र

गोद्री येथील कुंभमेळ्यात दाखल होणाऱ्या भाविकांसाठी २४ तास अन्नछत्रात भोजनाची व्यवस्था असणार आहे. कुंभस्थळी मुख्य सभामंडपाच्या समोरील बाजूसही भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. त्यात रोज दीड लाखापेक्षा अधिक भाविक भोजन करतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

चार हेलिपॅडची उभारणी

सहादिवसीय कुंभासाठी देशभरातून विविध राष्ट्रीय संत, राजकीय नेते, मंत्री तसेच विशेष पाहुणे येणार आहेत. येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांच्या सोयीसाठी चार हेलिपॅडची उभारणी करण्यात येत आहे.

महिला भाविकांसाठी स्वतंत्र नगर

कुंभासाठी दहा लाख भाविक तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांतून येणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी सात नगरांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी एक स्वतंत्र नगर महिलांसाठी असणार आहे. तसेच अडीच ते तीन हजार महिलांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या नगरात मंडपात निवास व्यवस्थेसह स्नानगृहे साकरण्यात येत आहेत. त्यात पिण्याच्या पाण्यासह अत्याधुनिक पद्धतीच्या शौचालयांचीही उभारणी करण्यात आली आहे.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

नव्वद संत कुटिया

अडीचशे एकर मंडपासह सहा डोम, नव्वद संत कुटिया

अडीचशे एकरच्या मंडपातील गोद्री कुंभात सहा डोम व नव्वद संत कुटिया उभारण्याचे काम सुरू आहे. त्यात मुख्य सभागृहाचा डोम जर्मन हँगर उज्जैन येथून येणार आहे. कुंभात सभा मंडपाचा डोम हा मुख्य डोम असणार आहे. याठिकाणी विशेष मान्यवर येणार असल्याने त्यादृष्टीने त्यांची उभारणी करण्यात येणार आहे.

गुरुद्वाराकडून लंगर

गोंद्री येथील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी बचत गटाच्या स्टॉलला जागा देण्यात आली आहे. त्यात २०० बचतगट आपल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन लावणार आहे. धार्मिकस्थळी मंदिराच्या मागच्या बाजूला केंद्रीय कार्यालय असणार आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अमृतसर, नांदेड येथील गुरुद्वाराच्या माध्यमातून भाविकांसाठी प्रसादाचे लंगर लावण्यात येणार आहे.

दोन हजार पोलिसांचा ताफा

कुंभात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता याठिकाणी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय अग्निशामक दल, रुग्णवाहिका, रुग्णालयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मोबाईल कनेटिव्हिटीसाठी ‘बीएसएनएल’कडून तात्पुरत्या स्वरूपाच्या मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

SCROLL FOR NEXT