Sharad Pawar Ajit Pawar road show in Amalner on 16 june jalgaon news  esakal
जळगाव

Jalgaon Sharad Pawar : अमळनेरात शरद पवार, अजित पवारांचा रोड शो; 1500 प्रतिनिधींची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शुक्रवारी (ता. १६) अमळनेर येथे रोड शो होणार आहे, तसेच ग्रंथालय सेलचे राष्ट्रीय अधिवेशनही होणार आहेत.

राज्यभरातून तब्बल १५०० प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ प्रतोद आमदार अनिल पाटील, ग्रंथालय सेलचे राज्याध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली. (Sharad Pawar Ajit Pawar road show in Amalner on 16 june jalgaon news)

येथील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार अनिल पाटील व उमेश पाटील यांनी सांगितले, की अमळनेर येथे ग्रंथालय सेलचे राज्यस्तरीय अधिवेशन शुक्रवारी होईल.

अधिवेशानाचा प्रारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते होईल. राज्याचे विरोधी पक्षतेने अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, लेखक रावसाहेब कसबे, विजय चोरमारे आदी उपस्थित राहतील. राज्यातील नऊ ग्रंथालयांना शरदचंद्र पवार उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. अधिवेशनाचा समारोप अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येईल.

नेत्यांचा रोड शो

पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले, की तब्बल १४ वर्षांनंतर खासदार शरद पवार अमळनेर भूमीत येत आहेत. खासदार शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांचा रोड शो होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयापासून, तर ग्रंथालय सेल अधिवेशनापर्यंत रोड शो होईल. जळगाव ते अमळनेरदरम्यान धरणगाव व टाकरखेडा येथे शरद पवार यांचा सत्कार होईल. शिवाय ग्रंथालय सेलच्या अधिवेशनाचा समारोप झाल्यावर अमळनेर येथील प्रशासकीय इमारत उभी करण्यात येणाऱ्या वादग्रस्त जागेस भेट देणार आहेत.

खासदार शरद पवार जळगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, ॲड. रोहिणी खडसे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, विकास पवार, विलास पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT