Sharad Pawar Paying Tribute to ND Mahanor esakal
जळगाव

Jalgaon News: शरद पवार यांनी घेतली महानोर कुटुंबियांची सांत्वनपर भेट

मित्र गेल्याचे दुःख व्यक्त करत जुन्या आठवणींन्ना दिला उजाळा

विलास जोशी

Jalgaon News : मैत्री काय असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिवंगत कविवर्य ना धो महानोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार व दिवंगत उद्योगपती भवरलाल भाऊ जैन या त्रिकुटाची मैत्री सर्वश्रुत आहे.

याचा प्रत्यय आज कवी महानोर यांच्या निधनानंतर कुटुंबियांच्या सांतवण प्रसंगी आज भेट देऊन कुठिम्बियांची आस्थेवाईक पणे चौकशी केली. पळसखेड येथे तब्बल 45 मिनिट थांबून कुटुंबियांची भेट घेऊन आदरांजली अर्पण केली. (Sharad Pawar paid condolence visit to marathi poet Mahanor family Jalgaon News)

यावेळी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जैन उद्योग समूहाचे अशोक भाऊ जैन, जळगावं जिल्हा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, रवींद्र भैय्या पाटील, संजय गरुड, श्रीमती वंदना चौधरी, दिगंबर पाटील, रंगनाथ काळे उपस्थित होते

याप्रसंगी कवी महानोर यांचे सुपुत्र डॉ बाळासाहेब महानोर, गोपाळ महानोर, बंधू पुंडलिक महानोर, मुली सरला शिंदे, सौ. मीरा, सौ. रत्ना व नाती शशी व नातेवाईक उस्थित होते.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. काव्य, लेख आणि लघुलेख महानोरांचा या सर्व क्षेत्रात शेती हा विषय अग्रस्थानी ठेवून त्यांनी त्यांचे ठिकाण प्रस्थापित केले.

पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपटाच्या माध्यमातून मराठी माणसाच्या मुखातून त्यांची गाणी अनेक ठिकाणी ऐकायला मिळायची. त्या गाण्यांचा मनापासून स्वीकार मराठी माणसाने केलेला दिसतो.

त्यांना शेतीचे ज्ञान व आस्था होती. पाणी हा शेतीचा अत्यंत महत्वाचा भाग आणि पळसखेडी आणि तो सर्व परिसर दुष्काळग्रस्त असल्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाला तिथे महत्व आहे. ते नेहमी जल सिंचनाचे महत्व सांगत असत.

शेतीबद्दलची त्यांची आस्था जे कोणी त्यांच्या शेतात गेला असाल त्यांनी पाहिली असेल, त्यांच्या लक्षात येईन. महाराष्ट्राच्या विधानसभेतून विधान परिषदेत त्यांना जायची संधी मिळाली.

त्यांनी या काळात म्हणजेच तब्बल १२ वर्ष त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या संबंधित विचार मांडले, जे प्रत्येक सदस्यांनी ऐकायला हवे. तासन्‌तास ते बोलायचे त्यांच्यावर कोणी कधी वेळेची मर्यादा केली नाही. ते असे मुद्देसूर भाषण करायचे की, सर्व ऐकत बसायचे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अतिशय उत्तम अशा प्रकारचे त्यांचे व्याख्यान असायचे. एकदा मला काहीतरी कामासाठी अमेरिकेला जायचे ठरले. त्याच्यामध्ये ते येताना येतो म्हटलं. एका अटीवर मला ती शेती बघायची आहे. आणि मी त्यांना तयार केले.

पहिल्यांदा मला सर्व तयार करायला लावले. तुम्ही वेशभूषा बदला त्यांचा शर्ट आणि पायजमा याच्यावर ते जायला तयार नव्हते. पण बराच आग्रह केल्याच्यानंतर मला आठवतेय की मी एका टेलरला बोलावले आणि म्हटले कमीत कमी यांचे पॅन्ट आणि शर्टच माप घ्या आणि काही ड्रेस आणून द्या.

झाले काम आणि अगदी नाईलाजाने त्यांनी पॅन्ट आणि शर्ट परिधान केले आणि विमानामध्ये बसले. तिथे गेल्यानंतर आम्ही अमेरिकेची शेती, त्याचा अर्थशास्त्र, त्यांनी केलेला नवीन संशोधन याच्यावर अत्यंत सखोलपणाने अभ्यास करण्याची भूमिका ते सातत्याने घेत होते.

अमेरिकेची बाकीची प्रगती यासंबंधीची आस्था त्यांना नव्हती. एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये उतरल्याच्या नंतर तिथली काही माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न केला, तर ते कटाक्षाने सांगायचे यासाठी आपण नंतर वेळ काढूया.

पण शेतीचे काय याबद्दल मला माहिती द्या आणि म्हणून खऱ्या अर्थाने, अखंडपणाने शेतकऱ्यांबद्दल आस्था ठेवणारा असा महानोर आज आपल्या सगळ्यांच्यामध्ये नाही आहे. एकदा बोलायला लागले तर त्यांचे बोलणे थांबायचे नाही.

एखादे काव्य किंवा त्यासंबंधीचा विषय असेल की ते सलग बोलायचे. मला आठवतंय एक दिवशी पु. ल. देशपांडे यांनी त्यांचे प्रदीर्घ भाषण ऐकल्यानंतर त्यांना सांगितलं नामदेव तुझं नाव मी आजपासून बदलतोय तू रानकवी आहेस.

एकदा तू सुरुवात केली बोलायला लागलास की रान मला आठवतंय की पु. ल. देशपांडे यांनी असा उल्लेख त्यांचा केला होता. हे ठिकाण मराठी क्षेत्रातले नामवंत साहित्यांबद्दल एका दृष्टीने पवित्र असे ठिकाण होते.

तिथे कधी ग. दि. मा. जातील, कधी पु. ल. देशपांडे जातील व कधी लताबाई. अनेक अशा महत्वाच्या कर्तृत्ववान कविता आणि संगीतात ज्यांचे योगदान आहे असे अनेक लोक जाऊन आले, आणि त्यांचा पाहुणचार त्यांनी घेतला. त्याहीपेक्षा शेतीच्या संबंधितील त्यांची आस्था समजून घेण्याचा काम त्यांनी केला.

अलीकडच्या काळामध्ये महानोर एका वेगळ्या स्थितीत होते. त्यांच्या पत्नी गेल्या आणि त्यानंतर हा गृहस्थ सावरलाच नाही. मी आणि माझी पत्नी आम्ही अनेकवेळा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी गप्पा- गोष्टी केल्या.

पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो खचला आणि एकदिवशी आपल्यातून निघून गेला. आज त्यांनी जे शेतीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे योगदान दिलेले आहे, ते कधीही विसरलं जाणार नाही. अधिक बोलण्याचा हा प्रसंग नाही

कुटुंबियांशी तब्बल अर्धा तास भेट घेऊन चौकशी केली. येथे शेती कोण पाहत तसेच सर्वांचा परिचय तसेच आठवणी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT