NCP leader MP Sharad Pawar while guiding the Swabhiman meeting held at Sagar Park ground on Tuesday afternoon. esakal
जळगाव

Sharad Pawar News : लाठीहल्ला करणाऱ्यांना जनता सत्तेवर ठेवणार नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

Sharad Pawar News : जालना जिल्ह्यात शांततेने उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता सत्तेवर ठेवणार नाही, संधी मिळेल तेव्हा त्यांचा पराभव करतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जळगाव येथे जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले.

सागरपार्क मैदानावर शरद पवार यांची स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती. (Sharad Pawar statement about jalna maratha protest lathi charge jalgaon news)

त्या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, डॉ. सतीश पाटील, ॲड. रोहिणी खडसे, संतोष चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले, की देशातील आणि राज्यातील सरकारला शेतकऱ्यांविषयी कोणतीही आस्था नाही. नाशिकचा कांदा, कापूस यांच्या भावाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात तब्बल वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेतकरी हा भीक मागत नाही तर आपल्या घामाची किंमत मागतो आहे.

मात्र हे सरकार तेव्हढेही त्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे देशातील आणि राज्यातील सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात दिली आहे, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जालना जिल्ह्यात शांततेत उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी अशा सरकारला सत्तेवर ठेवणार नाही, संधी मिळेल तेव्हा त्यांचा पराभव करतील.

सत्तेचा गैरवापर

देशातील सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करून शरद पवार म्हणाले, की सत्तेचा उपयोग जनतेसाठी करायाचा असतो, परंतु सध्याचे सरकार सत्तेचा वापर ईडी व सीबीआयच्या कारवाया विरोधकांवर करण्यासाठी वापरत आहेत. नवाब मलीक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली. सद्यःस्थितीत सत्तेचा संपूर्ण गैरवापर सुरू आहे.

...तर मोदी काय शिक्षा घेणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ येथे गेले होते. त्या वेळी जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. खरंच चुकीचे काम केले असेल तर त्याची सखोल चौकशी करा; परंतु जर खोटं निघाल तर पंतप्रधान काय शिक्षा घेणार, हेही त्यांनी सांगावा. पंतप्रधानांनी खोटे आरोप करावे ही जनतेच्या हिताचे नाही, असेही मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT