Uddhav Thackeray and Sharad Pawar Esakal
जळगाव

Sharad Pawar Uddhav Thackeray News : शरद पवार, उद्धव ठाकरे सप्टेंबरमध्ये जळगावात जाहीर सभा

सकाळ वृत्तसेवा

Sharad Pawar Uddhav Thackeray News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे येत्या ४ सप्टेंबरला जळगावात येत आहेत. त्या पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही येत्या १० सप्टेंबरला जळगावात येत आहेत.

त्यामुळे पुढील महिन्यात जिल्ह्यात राजकिय धुमाळी असणार आहे. (Sharad Pawar Uddhav Thackeray public meeting in Jalgaon in September news)

राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींनंतर श्री. पवार प्रथमच जळगावात येत आहेत. त्यांची सागर पार्क मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

तर, श्री. ठाकरे यांच्या हस्ते १० सप्टेंबरला पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली. या संदर्भात त्यांनी नुकतीच मुंबई येथे श्री. ठाकरे यांची भेट घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांच्या समवेत महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते. जळगावमध्ये ठाकरे यांचीही जाहीर सभा होणार असून, त्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थतीचा आढावाही घेतल्याचे भंगाळे यांनी सांगितले.

"पिंप्राळा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याच्या जागेचे भूमीपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अनावरणालाही आपण येवू असा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे." -कुलभूषण पाटील, उपमहापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT