Shasan Aapalya Dari esakal
जळगाव

Jalgaon News : ‘शासन आपल्या दारी’त नोंदवणार प्रशासनाचा निषेध; ग्रामस्थांच्या समस्या ‘जैसे थे’

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील सात्री ग्रामस्थांच्या समस्या आंदोलने करूनही सुटत नसल्याने अखेर शासन आपल्या दारी योजनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध करीत काळे कपडे आणि काळा दुखवटा परिधान करीत माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी सोमवारी प्रशासनाला कवड्यांची माळ आणि निषेधाचे निवेदन दिले.(Shasan Aplya Dari scheme against protest of villagers administration will be recorded Villagers problem not solved Jalgaon News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला महेंद्र बोरसे यांनी आंदोलन केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्रांताधिकारी कार्यालय आणि पाटबंधारे कार्यालयात त्यांनी हे आंदोलन केले आहे. मुख्यमंत्र्यांसमोरही महेंद्र बोरसे हे आंदोलन करणार असल्याने त्यांचे आंदोलन होऊ न देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.

दरम्यान, महेंद्र बोरसे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सात्री हे गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसे या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात पूर्णत शंभर टक्के बाधित होते. गावात पावसाळ्यातील पूरस्थितीत पाण्याचा वेढा असतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे ४ ते ५ महिने संपर्क पूर्णतः तुटत असल्याने जीवनमान विस्कळीत होते. या कालावधीत साथीचे रोग व अन्य रोगांची मोठ्या प्रमाणात लागण होते. बाधित रुग्णांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाही.

पर्यायाने जीव गमवावा लागतो. दरम्यान मागील दोन वर्षात प्रमोद बोरसे (वय २०), आरुषी भिल (वय ११ ) उषाबाई भिल (वय ५५) या बाधित लोकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला. यावेळी ग्रामस्थांच्या रोषाला व

आंदोलनास प्रशासनाला सामोरे जावे लागले आहे. मयतांच्या वारसांना अद्याप पावेतो मुख्यमंत्री सहाय्यता निधी देखील उपलब्ध झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT