Speaking at the Shiv Sena meeting held at Lewa Bhavan on Friday, Liaison Chief Sanjay Sawant.
Speaking at the Shiv Sena meeting held at Lewa Bhavan on Friday, Liaison Chief Sanjay Sawant. esakal
जळगाव

Shinde Vs Thackeray | चिन्ह पक्ष चोरणाऱ्या गद्दारांना..... : संजय सावंत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आनंद दिघे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी एकनिष्ठ होते. मात्र, त्यांच्याच नावाखाली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली.

चिन्ह आणि पक्षही चोरला. (Shiv Sena Thackeray group District public relations chief Sanjay Sawant statement about cm eknath shinde jalgaon news)

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक राहून या चोरांना त्यांची जागा दाखवायची आहे, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शुक्रवारी (ता. ३) येथे केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे लेवा भवनात झालेल्या शिवगर्जना अभियान मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख डॉ. हर्शल माने, दीपक राजपूत, महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, जिल्हा संघटक गजानन मालपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संजय सावंत म्हणाले, की उद्धव ठाकरे यांच्याशी ४० आमदारांनी गद्दारी केली आहे. त्याच गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी आपण सर्व हेवेदावे विसरून एक झाले पाहिजे. उद्धव ठाकरे यांना आपल्याला पुन्हा मुख्यमंत्रिपदी बसवायचे आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

त्यामुळे आघाडीच्या पक्षातील कोणताही उमेदवार असला तरी त्याला निवडून द्यायचे आहे व एकता काय असते हे गद्दारांना दाखवून द्यायचे आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करून एकता काय असते, ते शिंदे आणि मिंधे सरकारला दाखवून दिले आहे. हीच एकता पुढेही कायम ठेवायची आहे.

प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सगळे एकत्र काम करू आणि शिवसेनेशी केलेल्या गद्दारांना पाडू, असा निर्धार या वेळी व्यक्त केला.

गुलाबराव चिमणरावांना त्रास का दिला?

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्ही मराठा मुख्यमंत्री करण्यासाठी पक्षातून बाहेर पडलो, असे जाहीर सांगितले. त्यावर टीका करताना संजय सावंत म्हणाले, की गुलाबराव पाटील स्वत:ला शिवसैनिक म्हणवतात. मात्र, मी गद्दारी केली, असे त्यांनी एक नव्हे, तर तीन वेळा सांगितले.

त्यासाठी त्यांनी वेगवेगळे कारणेही दिली आहेत. आता मराठा मुख्यमंत्री करायचा होता, म्हणून गद्दारी केली, असे ते म्हणतात. मग चिमणराव पाटील मराठाच होते, ना मग त्यांना त्रास कसा दिला, हे चिमणराव पाटील यांनी जाहीर सांगितले आहे. त्यांच्यावर ही बोलण्याची वेळ का आणली, असा टोलाही श्री. सावंत यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT