Farmer
Farmer esakal
जळगाव

मजूरटंचाई, डिझेल दरवाढीने बळीराजाचा ताळमेळ जमेना

दीपक कच्छवा :सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : सध्या मजूरटंचाई आणि डिझेल दरवाढीने (Diesel price hike) बळीराजा हैराण झाला आहे. जास्तीचे पैसे देऊनही मजूर मिळत नाही तर इंधन दरवाढीने शेती कसायची कशी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. मात्र, अशाही विमनस्क परिस्थितीत वरखेडेच्या चित्राताईंनी हिमतीने पदर खोचून शेतीपुढील आव्हाने पेलत यंदाच्या हंगामात ट्रॅक्टरची मदत न घेता व मजूरटंचाईवर मात करत मशागतीसह शेतीची विविध कामे स्वत:च करायला सुरवात केली आहे. वरखेडेच्या चित्राताई हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. चित्राताईंसारख्या आज कितीतरी महिला ग्रामीण भागात शेतीचे आव्हान सक्षमपणे पेलत आहेत.

पावसाळा तोंडावर आल्याने बळीराजाला शेती तयार करण्याचे वेध लागले आहेत. डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वच क्षेत्रांना त्याचा फटका बसत आहे. ग्रामीण भागातील शेती व्यवसायही यातून सुटलेला नाही. डिझेलचे दर वाढले आणि शेती मशागतीचे सध्या महत्त्वाचे असे साधन ट्रॅक्टरच्या मशागतीचे दरही वाढल्याने पिकांना होणारा खर्च व शेतमालाला मिळणारा बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. या सर्व गोष्टी पाहता वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील चित्राताई जगताप या शेतकरी महिलेसह त्यांचे संपूर्ण कुटुंब हे शेतीपुढी आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाले आहे. चित्राताई यांचे पती संभाजी जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करतात. मात्र, शेती कसताना दरवर्षी येणाऱ्या अडचणींचा डोंगर पार करताना नाकीनऊत येत असल्याचे ते सांगतात. डिझेलचे दर आकाशाला भिडल्याने चित्राबाई व त्यांचे पती संभाजी यांनी ट्रॅक्टरला फाटा देत यंदा बैलजोडीने मशागत करण्यास सुरवात केली आहे. चित्राताई स्वतः बैल हाकतात तर त्यांचे पती लोंखडी नांगरच्या साह्याने नांगरटी करीत आहेत. त्यांनी दोन दिवसांत अडीच एकर शेत नांगरले. शेतकरी दाम्पत्य असलेल्या जगताप यांच्याप्रमाणे आज अनेक कुटुंबे समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. अशा शेतकऱ्यांना जिद्दी जगताप दाम्पत्यांची ही कृती बळ देत आहे.

चित्राताईंच्या चोख नियोजनातून शेती

चित्राताईंचा दिवस पहाटे पाचला सुरू होते. जनावरांना चारापाणी करण्यासाठी त्या गाई व म्हशीचे असे ४० लिटर दूध स्वतः काढतात. त्याचबरोबर शेतात पिकावर फवारणी करण्यासाठी स्वत:च्या पाठीवर हातपंप लावून फवारणी करतात. मजुरांच्या कमतरतेमुळे शेतात प्रत्येक काम त्या स्वत: व कुटुंबाला सोबत घेऊन करतात.

''शेतीकांमाना मजूर मिळत नाही. त्यातच आता डिझेलचा खर्च परवडत नसल्याने ट्रॅक्टरचे भाडेही आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे नसल्याने मी व माझे पती आम्ही स्वत: बैलजोडीच्या साह्याने शेती मशागत करीत आहोत. या महागाईच्या काळात शासनाने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.'' - चित्राबाई जगताप, महिला शेतकरी, वरखेडे (ता. चाळीसगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT