Drip Pipes esakal
जळगाव

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ‘ठिबक’मध्ये 25 टक्के सूट : श्रीराम पाटील

नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचामध्ये २५ टक्के सूट देण्याबाबत उद्योजक श्रीराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव) : तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचामध्ये २५ टक्के सूट देण्याबाबत श्रीराम इरिगेशन संस्थेचे संचालक तथा उद्योजक श्रीराम पाटील यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

श्रीराम पाटील म्हणाले, की २०१९ मध्ये अशाच प्रकारे वादळी पावसाच्या तडाख्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या वेळी आपल्या संस्थेतर्फे अशी सूट देण्यात आली होती. त्यात ४० शेतकऱ्यांनी फायदा घेतला होता. यावेळीही शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये शेत सफाईसाठी मिळावे. तसेच हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी. गेल्या पाच वर्षांपासून वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. विमा कंपनी व शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई तोडकी आहे. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, प्रवीज बिलाबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पाच हॉर्स पावरचा पंप असल्यास वीज मंडळाकडून दहा हॉर्स पॉवरचे बिल आकारणी केली जाते. यासंदर्भात आपण कृषिमंत्र्यांना भेटून समस्या सांगणार असल्याचे श्रीराम पाटील यांनी सांगितले. या वेळी डॉ. सुरेश पाटील, जिल्हा ड्रीप असोसिएशनचे अध्यक्ष सोपान पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Live Update: डोंबिवली येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड

Aadul News : रमजान ईदवर अवकाळी पावसाचे सावट; आडूळ परिसरात पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT