A nurse during a health check-up of pregnant women in a rural area. esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यातील माता मृत्यूदरात लक्षणीय घट; आरोग्यसेविकांचे अथक प्रयत्नाचे फलित

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील माता मृत्यूदरात तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. २०२२-२३ मध्ये ४१ माता मृत्यू झाले. एप्रिल २३ ते नोव्हेंबर २३ या आठ महिन्यांत ११ मातांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाबरोबरच दुर्गम भागात कार्यरत आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविकांची कामाप्रति निष्ठा व समर्पण वृत्ती यामुळे मातांची प्रसूती वेळेवर व सुरळीत करणे शक्य झाले.(Significant reduction in maternal mortality rate in district jalgaon news)

याकारणाने माता मृत्यूदरात लक्षणीय घट झाली. सातपुड्याच्या दुर्गम भागात कार्यरत आशा स्वयंसेविका व आरोग्यसेविका पावसाळ्यात तापीला पूर आलेला असतांनाही जिवाची पर्वा न करता प्रसूतीसाठी नदी ओलांडून गाव-पाड्या वस्त्यांवर पोचतात.

यामुळे मातांची प्रसूती वेळेवर होते. अमळनेर तालुक्यातील सात्री येथे पुराचा वेढा असतानाही पोलिसपाटलांच्या मदतीने वैद्यकीय पथकाने जिवाची पर्वा न करता बाळ व बाळंतिणीचा जीव वाचविण्याची घटना काही महिन्यांपूर्वीच घडली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी‌ डॉ. विवेकानंद बिराजदार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांच्या पथकाने सातपुड्याच्या जामन्या-गाडऱ्यासारख्या दुर्गम पाड्यांवर भेटी देत आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

मानव विकास कार्यक्रम जिल्ह्यात अमळनेर, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर येथे राबविण्यात येतो. यामध्ये ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक महिन्यात शिबिरे घेऊन बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांकडून गर्भवती व बालकांची तपासणी करण्यात येते. यात गर्भवतीला प्रसूतीआधी दोन हजार व प्रसूतीनंतर दोन हजार अशी एकूण चार हजार बुडित मजुरी दिली जाते. अतिदुर्गम भागात भेटी देऊन मार्गदर्शन केले जाते.

प्रसूतीदरम्यान अधिक मृत्यू

प्रसूतीच्या दरम्यान ओढवणारे मातांचे मृत्यू हे माता मृत्यूमागील मोठे कारण आहे. जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये २९ मातामृत्यू झाले. यात ग्रामीण भागात २१ व महापालिका हद्दीत नऊ मातांच्या मृत्यूचा समावेश होता. २०२१-२२ मध्ये ४० माता मृत्यू झाले. यात ग्रामीण भागात १६ व महापालिका हद्दीत २४ माता मृत्यूचा समावेश होता.

२०२२-२३ मध्ये ४१ मातामृत्यू झाले. यात ग्रामीण भागात आठ व महापालिका हद्दीत ३३ माता मृत्यूचा समावेश होता. एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत ११ माता मृत्यु झाले. यात ग्रामीण भागात पाच व मनपा हद्दीतील सहा माता मृत्यूचा समावेश आहे.

''जिल्ह्यातील आरोग्य विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजना, आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविकांनी समर्पित भावनेने केलेल्या कामांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.''-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT