जळगाव : वाढती महागाई, कोरोनोच्या नवीन व्हेरिएंटचा एकत्रित परिणाम म्हणून गेल्या पंधरवड्यात सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. लग्नसराई सुरू असली, तरी ग्राहकांनी अगोदरच सोने-चांदी खरेदी केल्याने सध्याच्या दरात घसरण होत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात १३ नोव्हेंबरला ६८ हजार रुपये प्रतिकिलो असणाऱ्या चांदीचे दर सध्या ६३ हजारांपर्यंत म्हणजेच पाच हजारांनी घसरले आहेत.
सोन्याच्या दरात प्रतितोळा ११०० रुपयांची घसरण झाली आहे. मागील महिन्यात ४९ हजार ५०० रुपये दर होता, तो आता ४८ हजार ४०० वर आला आहे. दर कमी झाल्याने ग्राहकांची क्रयशक्ती वाढली आहे.
दसरा, दिवाळीला ४८ हजार ४०० रुपये प्रतितोळा असलेल्या सोन्याच्या दरात आठवडाभरात तेराशे रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह ५० हजार ८८५ पर्यंत पोचले होते. या दरवाढीला लग्नसराईसाठी होणारी वाढीव मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या दरात आलेली तेजी कारणीभूत होती.
असे होते काही दिवसांतील दर (अधिक जीएसटी)
तारीख - सोने (प्रतितोळा) - चांदी (प्रतिकिलो)
१३ नोव्हेंबर - ४९ हजार ५०० - ६८ हजार
१ डिसेंबर - ४८ हजार ४०० - ६५ हजार
७ डिसेंबर - ४७ हजार ९०० - ६३ हजार
८ डिसेंबर - ४८ हजार ४०० - ६३ हजारज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.