लसीकरण 
जळगाव

जळगाव: आतापर्यंत 12 लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

देविदास वाणी ः सकाळ वृत्तसेवा

शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांचे लसीकरण सुरू केले.

जळगाव: जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख ९६ हजार ९३८ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला, तर तीन लाख १५ हजार ९१६ लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण १२ लाख १२ हजार ८५४ लाभार्थ्यांना कोरोना लशींचे डोस देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय प्रारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झाला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांचे लसीकरण सुरू केले. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यास सुरवात केली. त्यानंतर ४५ वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. तर १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरू करण्यात आले.

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह काही खासगी रुग्णालयांतूनही नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तर १ ते ११ मेपर्यंत जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण करण्यात आले. त्यानंतर २१ जूनपासून जिल्ह्यातील १८ वर्षापुढील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्त्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरिकही स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी करीत आहे.

तालुकानिहाय झालेले लसीकरण :

जिल्ह्यात एकूण १२ लाख १२ हजार ८५४ लाभार्थ्यांना लशींचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील ५ लाख ८६ हजार २१० तर ग्रामीण भागातील ६ लाख २६ हजार ६४४ लाभार्थ्यांचा समावेश आहे. जळगाव- ३०५१४८, भुसावळ- १५४९७८, अमळनेर- ७५४०१, चोपडा- ७७१३८, पाचोरा- ६४२५३, भडगाव- ४०१९८, धरणगाव- ३९८६९, यावल- ६७९६०, एरंडोल- ३५८१४, जामनेर- ७६६२१, रावेर- ८२३२५, पारोळा- ४०६२६, चाळीसगाव- ९३७८१, मुक्ताईनगर- ३६७७७, बोदवड- २१९६५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT