liver transplant
liver transplant esakal
जळगाव

Jalgaon News : युवकाच्या यकृत प्रत्यारोपणासाठी एकवटली तरुणाई; आर्थिक मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : करणखेडे (ता. अमळनेर) येथील रहिवासी व सध्या पुणे येथे रोजगारासाठी वास्तव्यास असलेले संतोष धोंडू पाटील यांचा मुलगा राहुल पाटील (वय १७) याचे यकृत निकामी झाले आहे. राहुलचे वडील संतोष पाटील यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. (Social media appeal from youth for financial support to liver transplant of rahul patil jalgaon news)

हातावरचे पोट, घरी स्वतःची शेतजमीन नसल्याने काही वर्षांपूर्वी ते रोजगारासाठी पुणे येथे स्थिरावले. ते तेथील खासगी कंपनीत वॉचमनची नोकरी करतात. त्यांच्या पत्नी छायाताई धुणी-भांडी करून आपल्या संसाराला हातभार लावतात.

त्यांना दोन अपत्य; मोठी मुलगी नंदिनी सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे व लहानगा राहुल दहावीच्या वर्गात आहे. परिस्थिती जेमतेम असली तरी आपल्या मुलांनी खूप शिकावे, अशी दोघा पती-पत्नींची इच्छा होती. परंतु गतवर्षी राहुलची तब्येत अचानक बिघडली. त्याला नवी मुंबईच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले.

त्या ठिकाणी विविध तपासण्या केल्यानंतर राहुलचे यकृत निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. एकुलता एक मुलगा त्याच्यातच शरीराचा महत्त्वाचा अवयव निकामी झाल्याने या परिवाराच्या पायाखालची जमीन सरकली.

त्यांना डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला असून, राहुलची मोठी बहीण नंदिनी यकृत दान करण्यासाठी तयार असून, डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचा खर्च २१ लाख रुपयांपर्यंत सांगितला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यकृत प्रत्यारोपण तातडीने न केल्यास राहुलच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी सूचनाही डॉक्टरांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री सहायता फंड व मुख्यमंत्री सहायता निधी यासाठीही प्रस्ताव पाठवला असून, त्यातून सहा लाख रुपये उभे राहणार आहेत.

बाकीचे १५ लाख रुपये कसे कसे उभे करायचे, असा प्रश्न या दांपत्यापुढे उभा राहीला आहे. या व्यतिरिक्त महिन्याकाठी राहुलच्या विविध तपासण्या आणि औषधीचा खर्च जवळपास सहा हजारापर्यंत येत असून हे कुटुंब मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे.

मदतीसाठी तरुणांचे प्रयत्न

राहुलच्या मदतीसाठी गावातील तरुणांनी एकत्र येत सोशल मीडियावर देणाऱ्याने देत जावे.. हा ग्रुप स्थापन केला असून, त्याद्वारे गाव व गाव, नोकरी कामी बाहेरगावी वास्तव्यास गेलेल्या चाकरमान्यांना राहुलच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.

या अगोदरही करणखेडा येथे किशोर पाटील यांची किडनी निकामी झाल्याने या तरुणासाठी ग्रामस्थ व मारवड गावातील तरुणांनी त्याचप्रमाणे आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे यांनी मदतीचा हात देऊन किशोर पाटील यांना मदत झाली होती. आताही सर्व तरुण सोशल मीडियाने एकवटल्याने मदतीसाठी आवाहन केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT