Accident News esakal
जळगाव

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सासरा ठार; जावई जखमी

जावई आणि सासरा दुचाकीवरून जात असताना, येथील जामदा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : जावई आणि सासरा दुचाकीवरून जात असताना, येथील जामदा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. मागे बसलेला सासरा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला, तर जावई जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १९) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

अनिल गोरख चव्हाण (वय २६, रा. मोरदड तांडा, ता. जि. धुळे) रविवारी (ता. १९) सायंकाळी सासरे सुभाष नथ्थू राठोड (४५, रा. सेवानगर तांडा, ता. चाळीसगाव) यांना मोरदड तांडा येथून त्यांच्या गावी सेवानगर तांड्यावर सोडण्यासाठी दुचाकीने (एमएच १८, बीटी ९०५२) जात होते. सायंकाळी सातच्या सुमारास जामदा फाट्याजवळ मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (एनएल ०१, एई ८४६३) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेले सुभाष राठोड रस्त्यावर पडले व ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. या अपघातात अनिल चव्हाण जखमी झाले. त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने न थांबता, पळून जाण्यासाठी भरधाव ट्रक काढला. मात्र, अनिल चव्हाण यांनी आरडाओरड केल्यानंतर काही जणांनी दुचाकीवरून ट्रकचा पाठलाग केला व गिरणा हायस्कूलजवळ ट्रक पकडला. याबाबत अनिल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT